नितीश यांची काँग्रेसवर थेट टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:13 AM2017-07-29T04:13:11+5:302017-07-29T04:13:17+5:30

तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले. सभागृहात तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार यांनी एकदाही मला राजीनामा मागितला नाही किंवा काढलेही नाही.

naitaisa-yaancai-kaangaraesavara-thaeta-taikaa | नितीश यांची काँग्रेसवर थेट टीका

नितीश यांची काँग्रेसवर थेट टीका

Next

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रथमच शुक्रवारी विधानसभेत काँगे्रसवर थेट टीका केली. ते म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी मी काँग्रेसकडे केली होती. पण, त्यांनी काहीच केले नाही. आम्ही अनेक आव्हानांना सामोरे गेलो. त्यानंतरही आघाडी धर्माचे पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सत्ता सेवेसाठी असते, ‘मेवा’ नसते. सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी नसते. काँग्रेस आणि राजदला उद्देशून ते म्हणाले की, मला कोणीही जातीयतेचे धडे देऊ शकत नाही. काही जण पाप लपविण्यासाठी धर्मनिरपेक्ष झाले आहेत.
सभागृहात बोलताना नितीश कुमार म्हणाले की, ज्या लोकांनी आम्हाला मते दिली ते लोक त्रस्त होते. त्यामुळे जनहितासाठी हा निर्णय घ्यावा लागला. तेजस्वी यादव यांच्याकडे इशारा करून ते म्हणाले की, आम्ही मर्यादेत राहत आहोत. तुम्हीही दक्ष राहा. बिहारमधील भागलपूरमध्ये झालेल्या दंगलीचा उल्लेख करून ते म्हणाले की, या प्रकरणात अनेक लोकांना वाचविण्याचा प्रयत्न झाला. नितीश कुमार यांनी आज राहुल गांधी यांनाही उत्तर दिले. नितीश कुमार यांचा उल्लेख त्यांनी धोकेबाज असा केला होता. नितीश कुमार म्हणाले की, १५ जागा असलेल्या काँग्रेसला आम्ही ४० जागांपर्यंत पोहोचविले. आघाडी वाचविण्यासाठी काँग्रेसलाही मध्यस्थी करण्याबाबत सुचविले होते.

हे रामचे जय श्रीराम झाले !
तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले. सभागृहात तेजस्वी म्हणाले की, नितीश कुमार यांनी एकदाही मला राजीनामा मागितला नाही किंवा काढलेही नाही. नितीश कुमार यांचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या आहे. २८ वर्षांच्या एका तरुणाला लक्ष्य केले जात आहे. भाजपाला सत्तेची लालसा आहे आणि भाजपासोबत जाण्याची नितीश कुमार यांचीही तशी इच्छा होतीच. आम्ही असा कोणता अपराध केला की, तुम्ही हा निर्णय घेतला? महात्मा गांधी यांचा उल्लेख करून ते म्हणाले की, बापूंची हत्या करणाºयांसोबत तुम्ही हातमिळवणी केली आहे. संघमुक्त भारताबाबत कोण बोलले होते? मग, मुख्यमंत्री तुम्ही का घाबरलात? आम्ही मातीत मिसळू, पण भाजपासोबत जाणार नाही. आता आपण ह्यहे रामह्णचे ह्यजय श्रीरामह्ण झालात. लोकांनी भाजपाच्या विरुद्ध कौल दिला होता. नितीश कुमार यांनी बिहारचा अपमान केला आहे. ह्यबहती हवा सा था वो, गुजरात से आया था, काला धन लाने वाला था वो, कहा गया उसे ढुंढो, दाऊद को लाने वाला था वो, कहा गया उसे ढुंढोह्ण असे गीतही त्यांनी सादर केले.

आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नका
तेजस्वी यादव यांच्याकडे इशारा करून नितीश कुमार म्हणाले की, कोणीही आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये. धर्मनिरपेक्षता भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी नाहीय. हे लोक अहंकारात जिंकले आहेत. आपले पाप झाकण्यासाठी ते धर्मनिरपेक्षतेचा आधार घेतात. बिहारमध्ये आघाडीच्या काळात आमचे अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न झाला. केंद्रात आणि राज्यात एकाच आघाडीचे सरकार आल्याची ही पाहिली वेळ आहे.

राजद फुटला असता - सुशील मोदी
गुप्त मतदान झाले असते तर राजद पक्ष फुटला असता. एक डझनपेक्षा अधिक आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले असते, असे मत उप मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी यांनी व्यक्त केले. बहुमत सिद्ध केल्यानंतर बाहेर पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार मोदी यांनी राजद-काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, विश्वासदर्शक ठरावानंतर राजद आणि काँग्रेसला उत्तर मिळाले आहे. जदयू आणि भाजपा हे नैसर्गिक मित्र आहेत. आगामी ४० महिने आम्ही मजबुतीने सरकार चालवू. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, बिहारमधील ही आघाडी अधिक दिवस टिकणार नाही. नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांना वारंवार खुलासा करण्यास सांगत होते. पण, तेजस्वी यादव यावर खुलासा देऊच शकत नव्हते. कारण, त्यांच्याकडे या आरोपांचे काहीच उत्तर नव्हते. आपल्या एक हजार कोटी रुपयांच्या संपत्तीबाबतही ते काहीच बोलले नाहीत. २८ वर्षांच्या वयात तेजस्वी यांनी एवढी संपत्ती कशी जमविली ते बिहारच्या जनतेलाही जाणून घ्यायचे आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: naitaisa-yaancai-kaangaraesavara-thaeta-taikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.