मुदतीपूर्वी सुटकेचा नलिनीचा अर्ज फेटाळला
By admin | Published: July 21, 2016 04:48 AM2016-07-21T04:48:10+5:302016-07-21T04:48:10+5:30
माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनी श्रीहरन हिने मुदतीपूर्वी सुटका करण्याचा केलेला अर्ज विचारात घ्यायला मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला.
Next
चेन्नई : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनी श्रीहरन हिने मुदतीपूर्वी सुटका करण्याचा केलेला अर्ज विचारात घ्यायला मद्रास उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. अशाच स्वरूपाची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे नलिनीची विनंती मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले. नलिनी हिने घटनेच्या कलम १६१ अन्वये मुदतीपूर्वी तुरुंगातून सुटका करावी, असा आदेश तमिळनाडू सरकारला द्यावा अशी केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत विचारात घेता येणार नाही, असे न्या. एम. सत्यनारायण यांनी आदेशात स्पष्ट केले.