हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:55 AM2018-12-03T08:55:13+5:302018-12-03T11:51:43+5:30

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

The name of Hyderabad will also be changed, the Yogi MIM Warrior in Owaisi's Citadel | हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

हैदराबादचंही नाव बदलणार, ओवैसींच्या बालेकिल्ल्यातच योगींचा एमआयएमवर वार

Next

हैदराबाद - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता हैदराबादचे नाव बदलण्याची घोषणा केली आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करत तेलुगू नागरिकांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. रविवारी हैदराबादमध्ये निवडणूक प्रचारासाठी योगींनी सभा घेतली. त्यावेळी, तेलंगणात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार. तसेच हैदराबादमधील दहशतवादी कनेक्शनचाही बंदोबस्त करू, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी योगींनी एमआयएमसह काँग्रेस आणि टीआरएसलाही टार्गेट केलं.

देशात रामराज्य आणण्यासाठी भाजपने रणशिंग फुंकले असून त्यामध्ये तेलंगणाची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बेगम बझार या असुद्दुद्दीन ओवैसीच्या बालेकिल्ल्यातूनच योगी आदित्यनाथ यांनी तेलंगणातील जनतेला संबोधित केले. योगी यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर उत्तर प्रदेशमधील अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज केले. त्यानंतर, आणखी 25 शहरांच्या नाव बदलीचा प्रस्ताव भाजापाच्या विचारधीन असल्याचे समोर आले होते. तर, रविवारी पुन्हा एकदा हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करणार असल्याचे योगींनी म्हटले. तसेच हैदराबादमधून दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यात येत आहे. येथील काही संघटनांचे दहशवाद्यांशी संबंध असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही, असेही योगींनी आपल्या भाषणात म्हटले आहे. देशात कुठेही दहशतवादी घटना घडल्यास त्याचे धागेदोरे हैदराबादमध्ये सापडतात, असेही ते म्हणाले. दरम्यान, यापूर्वी गोशामहल मतदारसंघाचे भाजपा उमेदवार टी राजा यांनीही हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार असल्याचे एका स्थानिक सभेत बोलताना म्हटले होते.     
 

Web Title: The name of Hyderabad will also be changed, the Yogi MIM Warrior in Owaisi's Citadel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.