नाव पाकिस्तान आहे, मात्र काम नापाक - राजनाथ सिंह
By admin | Published: July 18, 2016 06:15 PM2016-07-18T18:15:55+5:302016-07-18T18:17:33+5:30
पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवारी) सुरुवात झाली. कोणतेही विधेयक सादर होण्यापूर्वी काश्मीर हिंसाचारावर चर्चा सुरु झाली. या चर्चेदरम्यान पाकिस्तानला लक्ष करताना गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, जवान शहीद झाल्यानंतर कोणी उस्ताह करत असेल तर ती इंन्सानियत नाही. नाव पाकिस्तान आहे, मात्र त्यांचे काम नापाक आहे. त्यांना आमच्या अंतर्गत मामल्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. जम्मू कश्मीच्या मुख्यमंत्री महबूबा यांनी स्थिती सामान्या होण्यापर्यंत थांबण्याचा सल्ला दिला आहे, तेथिल स्थिती सामान्या झाल्यास आम्ही कश्मीरच्या नागरिकासोबत चर्चा करणार आहे. काश्मीर मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेऊन राष्ट्रहिताचा विचार सर्वच पक्षांतून व्यक्त केला गेल्याबद्दल मोदींनी विरोधी पक्षांचे आभार मानले.
राजनाथ सिंह पुढे बोलताना म्हणाले, परदेश दौऱ्यावरुन आल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कश्मीर मुद्द्यावर बैठक घेतली होती. कश्मीरमध्ये हिंसाचाराच्या ५६६ घटना घडल्या त्यामध्ये १९४८ नागरिक जखमी झाले आहेत. तर हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वनी याचा ८ जुलै रोजी पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ३६ वर गेलेली आहे.
दरम्यान कश्मीर मुद्द्यावर काँग्रेसने राज्यसभेत पुन्हा एकदा सरकारला घेरले आहे. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले, काश्मीरची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अशी स्थिती तर १९९० मध्ये देखील नव्हती. दहशतवादाविरोधात आम्ही सरकारसोबत आहोत, मात्र काश्मीरमध्ये सामान्यांना लक्ष्य केले जात आहे.
काश्मीर जळतंय, मात्र ही आग दोन वर्षांची नसून गेल्या ६० वर्षांची आहे अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.