नाव छापलेली पिशवी विकली; १५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 12:54 AM2021-02-25T00:54:22+5:302021-02-25T00:54:28+5:30

मोफत पिशवी देण्याचे मोर मेगास्टोअर्सला ग्राहक मंचचे आदेश

Name printed bag sold; 15 thousand fine | नाव छापलेली पिशवी विकली; १५ हजारांचा दंड

नाव छापलेली पिशवी विकली; १५ हजारांचा दंड

Next

- खुशालचंद बाहेती

हैदराबाद : आपल्या कंपनीचे  नाव आणि लोगो छापलेल्या कॅरिबॅग देऊन ग्राहकांकडून तीन रुपये घेणे ही अनिष्ट व्यापार प्रथा असल्याचे ठरवत हैदराबादच्या ग्राहक मंचने मोर मेगास्टोअर्सला १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. 

आकाश नावाच्या विद्यार्थ्याने याविरुद्ध ग्राहक मंचकडे तक्रार दाखल केली होती. मोर मेगा स्टोअरने त्यांची प्रिंटेड पिशवी विकत देऊन ग्राहकाचा जाहिरात प्रतिनिधी म्हणून वापर करून घेतल्याचे त्याचे म्हणणे होते. ग्राहक मंचने हे म्हणणे मान्य करून तीन रुपये परत करण्याचे व सेवेतील त्रुटीबद्दल १५ हजार रुपये दंड देण्याचे आदेश दिले.

मेगा स्टोअर्सचे मुद्दे

मेगा स्टोअर्स प्लास्टिक वापरास प्रोत्साहन देत नाही. तसे फलक त्यांनी स्टोअरमध्ये लावले आहेत. फलकावर घरून पिशवी आणावी, न आणल्यास विक्रीसाठी उपलब्ध आहे, असे लिहिले आहे. 
पिशवी विकत घेणे ऐच्छिक आहे. ती जबरदस्तीने दिली जात नाही.
कॅरिबॅगचे पैसे घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही.

ग्राहक मंचचा निकाल

१. आपले नाव आणि बोधचिन्ह छापलेली पिशवी देऊन व त्याची किंमत वसूल करून ग्राहकाचा जाहिरातीसाठी उपयोग करण्यात आला आहे. ही अनिष्ट व्यापार प्रथा आहे, म्हणून ती सेवेतील त्रुटी ठरते. 
२. कंपनीचा हा छुप्या पद्धतीने केलेला बनाव आक्षेपार्ह आहे.
३. नाव न छापलेली पिशवी विकता येईल, पण तिची किंमत दर्शविणारे फलक दर्शनी भागात लावले पाहिजेत.
४. कंपनीकडे छापलेल्या पिशव्या असतील तर त्या ग्राहकांना मोफत द्याव्यात.

Web Title: Name printed bag sold; 15 thousand fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत