नीट परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थिनीला उतरवायला लावलं अंतर्वस्त्र

By admin | Published: May 7, 2017 11:24 PM2017-05-07T23:24:38+5:302017-05-07T23:24:38+5:30

राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षे(NEET)त अनुचित प्रकार थांबवण्याच्या नावाखाली लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना मनस्तापाला सामोरं जावं लागलं

In the name of the proper examination, the woman's underwear is taken down | नीट परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थिनीला उतरवायला लावलं अंतर्वस्त्र

नीट परीक्षेच्या नावाखाली विद्यार्थिनीला उतरवायला लावलं अंतर्वस्त्र

Next
>ऑनलाइन लोकमत
कन्नूर, दि. 7 - सरकारी आणि वैद्यकीय कॉलेजमधील प्रवेशासाठी घेण्यात येणा-या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षे(NEET)त अनुचित प्रकार थांबवण्याच्या नावाखाली लागू करण्यात आलेल्या ड्रेस कोडमुळे विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींना मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. एका विद्यार्थिनीला तर नीटच्या परीक्षेला बसण्यापूर्वी तिचं अंतर्वस्त्र काढण्यास सांगण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नीटची परीक्षा दिल्यानंतर त्या विद्यार्थिनीनं परीक्षा केंद्र अधिका-यांनी अंतर्वस्त्र काढण्यास सांगितल्याचं उघड केलं आहे. तर दुस-या एका विद्यार्थिनीला जिन्सचं बटन काढण्यास सांगण्यात आलं होतं. विद्यार्थिनीच्या वडिलांनीच हे उघडकीस आणलं आहे. 
सीबीएसईकडून रविवारी नीट परीक्षा घेण्यात आली. सकाळी १० ते १ ही परीक्षेची वेळ होती व त्यासाठी सकाळी ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आत यावे, अशी प्रवेशपत्रावरच अट होती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आधार कार्डदेखील आणणे सक्तीचे करण्यात आले होते.

परंतु विविध कारणांमुळे परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास विद्यार्थ्यांना उशीर झाला. काही विद्यार्थी बाहेरगावाहून आले होते, तर अनेकांना परीक्षा केंद्रच दूर मिळाल्यामुळे ते शोधताना त्यांना उशीर झाला. नियमांनुसार विद्यार्थी वेळेत आले नसल्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी गमवावी लागल्याने काही परीक्षा केंद्रावर पालकांनी आरडाओरड केली. विद्यार्थी आणि पालकांनी शाळा प्रशासनाकडे विनंती करूनही त्याचा उपयोग झाला नाही. वर्ष वाया जाण्याच्या भीतीने अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. 

Web Title: In the name of the proper examination, the woman's underwear is taken down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.