सभापतीपदासाठी वर्षा खडकेंचे नाव चर्चेत स्थायी समिती : सदस्यांची २६ रोजी होणार निवड
By Admin | Published: September 23, 2016 12:49 AM2016-09-23T00:49:50+5:302016-09-23T00:49:50+5:30
जळगाव: मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्यासह समितीतील १६ पैकी ८ सदस्य ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची २६ रोजीच्या महासभेत निवड होणार असून सभापतीपदासाठी खाविआतर्फे वर्षा खडके यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते.
ज गाव: मनपा स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांच्यासह समितीतील १६ पैकी ८ सदस्य ३० सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन सदस्यांची २६ रोजीच्या महासभेत निवड होणार असून सभापतीपदासाठी खाविआतर्फे वर्षा खडके यांचे नाव चर्चेत असल्याचे समजते. रिक्त होत असलेल्या ८ सदस्यांच्या जागी खाविआचे ४, भाजपाचे २ तर मनसे व राष्ट्रवादीचे प्रत्येकी १ सदस्य निवडून येणार आहेत. गटनेते २६रोजीच्या महासभेत ही नावे बंद पाकिटात महापौरांकडे देतील. त्यात सभेत शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. खाविआतर्फे सभापती नितीन बरडे यांना समितीत सदस्य म्हणून पुन्हा संधी दिली जाणार असून त्यांच्यासोबतच चेतन शिरसाळे, अजय पाटील, वर्षा खडके यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपातर्फे ॲड.शुचिता हाडा, नवनाथ दारकुंडे, उज्ज्वला बेंडाळे, जयश्री पाटील, दीपमाला काळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी चर्चा करूनच नावे अंतिम करण्यात येतील. तर मनसेतर्फे विजय कोल्हे, राष्ट्रवादीतर्फे शालिनी काळे यांची नावे चर्चेत असल्याचे समजते. २६ रोजीच्या महासभेत सदस्यांची निवड झाल्यानंतर सभापतीनिवडीसाठी सभा आयोजित करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानंतर विशेष सभेत ही निवड केली जाईल.