अंदमानातील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 06:09 AM2018-12-26T06:09:49+5:302018-12-26T06:10:01+5:30

सरकारने शहरांचे नावे बदलण्याचा धडाका लावलेला असताना आता मोदी सरकार अंदमान येथील तीन बेटांचे नाव बदलणार आहे.

The name of Subhash Chandra Bose of Andaman Island | अंदमानातील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव

अंदमानातील बेटाला सुभाषचंद्र बोस यांचे नाव

Next

नवी दिल्ली : सरकारने शहरांचे नावे बदलण्याचा धडाका लावलेला असताना आता मोदी सरकार अंदमान येथील तीन बेटांचे नाव बदलणार आहे. हॅवलॉक बेटाचे नाव स्वराज बेट तर, नेल बेटाचे नाव शहीद बेट आणि रोस बेटाचे नाव नेताजी सुभाषचंद्र बोस, असे करण्यात येणार आहे.
बेटांचे नाव बदलण्यासाठी गृहमंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्ट ब्लेअरच्या दौऱ्यादरम्यान रविवारी, ३० रोजी या बेटांचे नाव बदलण्यात येणार आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केल्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह गृहमंत्री राजनाथसिंह यांची उपस्थिती राहणार आहे.
मार्च २०१७ मध्ये भाजपाच्या एका खासदारांनी राज्यसभेत अशी मागणी केली होती की, या पर्यटन स्थळावरील बेटांची नावे बदलण्यात यावीत. येथील हॅवलॉक बेटाचे नाव हे ब्रिटिश जनरल सर हेन्री हॅवलॉक यांच्या नावावरून देण्यात आले होते.

Web Title: The name of Subhash Chandra Bose of Andaman Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत