या घोटाळ्यात आलं सनी लिओनीचं नाव, पोलीस चौकशी करण्याची शक्यता
By admin | Published: February 7, 2017 06:33 PM2017-02-07T18:33:59+5:302017-02-07T18:35:08+5:30
घोटाळ्यामध्ये नाव आल्यामुळे पोलीस सनी लिओनीची चौकशी करण्याची शक्यता
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - फेसबूकवर पोस्ट लाईक करा सांगत 3 हजार 700 कोटींचा घोटाळा करणा-या अनुभव मित्तलच्या अटकेनंतर आता याच प्रकरणी अभिनेत्री सनी लिओनीची चौकशी होण्याची शक्यता आहे.
फेसबूक पोस्ट लाईक करा आणि प्रत्येक लाईक मागे 5 रुपये मिळवा अशी ही स्कीम होती. याद्वारे तब्बल सात लाख लोकांना 3 हजार 700 कोटींचा गंडा घालण्यात आला होता. गुरुवारी एसटीएफने कंपनीचा मालक अनुभव मित्तलला अटक केल्यानंतर या महाघोटाळ्याचा खुलासा झाला होता.
गेल्या वर्षी 29 नोव्हेंबर रोजी मित्तलने आपल्या कंपनीच्यावतीने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला सनी लिओनीने हजेरी लावली होती. त्यामुळे याप्रकरणी पोलीस आता सनी लिओनीची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे हे प्रकरण-
नोएडामधून लोकांना गंडा घालण्याचा हा प्रकार सुरू होता. आपण फसवले गेलो असल्याची माहिती मिळाल्यानंतर हजारो लोकांनी कंपनीच्या बाहेर जमा होऊन गोंधळ घातला.
गुरुवारी पोलिसांनी कंपनीचा मालक अनुभव मित्तल, सीईओ श्रीधर आणि टेक्निकल हेट महेश दयालला अटक केली आहे. कंपनीचा मालक 26 वर्षीय अनुभव मित्तला ऐशोआरामात जगण्याची लालसा आहे. अनुभव मित्तल हा गाझियाबाद जवळच्या पिलखुआ या छोट्या गावातला रहिवासी आहे. त्याची हुशारी पाहून कॉलेजमध्ये मित्र त्याला ‘3 इडियट्स’च्या फुंगसुक वांगडूची उपमा द्यायचे. 2010 मध्ये इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षातच त्यानं कंपनी सुरु केली. अनुभवने पत्नी आयुषी मित्तललाही या कंपनीची संचालक केलं. हा महाघोटाळा समोर आल्यानंतर तिन्ही आरोपी परदेशी पळून जाण्याच्या तयारीत होते.
या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी कंपनीचा मालक अनुभव मित्तलसहित तिघांना अटक केली आहे. श्रीधर प्रसाद आणि महेश दयाल अशी इतर दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सदस्य झाल्यानंतर कंपनी ग्राहकांना त्यांच्या स्मार्टफोनवर एक लिंक पाठवायची. ही लिंक लाईक केल्यास कंपनी पाच रुपये द्यायची. मात्र काही दिवसांनी कंपनीने ग्राहकांना पैसे देणं बंद केलं. या स्कीममध्ये गुंतवणूकदारांकडून 5 हजार 750 रुपये ते 57 हजार 500 रुपयांची गुंतवणूक करुन घेतली जायची.
एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वी त्यांना या महाघोटाळ्याची माहिती मिळाली होती. कंपनी वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना घरबसल्या पैसे कमवण्याचं अमिष दाखवत होती. काही लोकांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी सुरजपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.