मामाला पेढे देण्यासाठी आलेला भाचा अपघातात ठार महामार्गावर चिरडले ट्रकने : दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद राहिला काही क्षणच

By admin | Published: June 9, 2016 10:42 PM2016-06-09T22:42:05+5:302016-06-09T22:42:05+5:30

जळगाव: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्या आनंदात जळगावला मामांना पेढे देण्यासाठी आलेल्या हितेश सुनील पाटील (वय १६ रा.कापडणे, ता.धुळे) याला मागून आलेल्या ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा गोपाळ सुभाष पाटील व जितेंद्र सुभाष पाटील हे दोघंजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर राधिका हॉटेलजवळ झाला.

Named after a maternal uncle's death, a truck hit on the highway: I was delighted to have passed 10th | मामाला पेढे देण्यासाठी आलेला भाचा अपघातात ठार महामार्गावर चिरडले ट्रकने : दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद राहिला काही क्षणच

मामाला पेढे देण्यासाठी आलेला भाचा अपघातात ठार महामार्गावर चिरडले ट्रकने : दहावी उत्तीर्ण झाल्याचा आनंद राहिला काही क्षणच

Next
गाव: दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्या आनंदात जळगावला मामांना पेढे देण्यासाठी आलेल्या हितेश सुनील पाटील (वय १६ रा.कापडणे, ता.धुळे) याला मागून आलेल्या ट्रकने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर मामा गोपाळ सुभाष पाटील व जितेंद्र सुभाष पाटील हे दोघंजण जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर राधिका हॉटेलजवळ झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, हितेश हा दहावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला. त्या आनंदात तो आईसह जळगावला असलेल्या दोन्ही मामांना पेढे देण्यासाठी आला होता. सावखेडा शिवारात बिबा नगर येथून दोघं मामा व हितेश हे जितेंद्र पाटील यांच्या निवृत्ती नगरातील घरी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.झेड.६७१४) जात असताना रात्री पावणे अकरा वाजता महामार्गावरील राधिका हॉटेलजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र.यु.पी.५८ टी.४०८९) धडक दिली. त्यात गोपाळ पाटील व जितेंद्र पाटील हे दुचाकीसह लांब फेकले गले तर हितेश हा मागील चाकात आल्याने चिरडला गेला. अपघात इतका भयंकर होता की, त्यात हितेशच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातानंतर चालक ट्रक सोडून फरार झाला. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला ट्रक चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Named after a maternal uncle's death, a truck hit on the highway: I was delighted to have passed 10th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.