तीनही पॅनलने केली उमेदवारांच्या नावांची घोषणा
By Admin | Published: July 9, 2015 09:53 PM2015-07-09T21:53:25+5:302015-07-10T00:28:36+5:30
शिवसेनेत फाटाफूट, भाजपा एकाकी
शिवसेनेत फाटाफूट, भाजपा एकाकी
नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत तीनही पॅनलच्या नेत्यांनी त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांची घोषणा (दि.९) केली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपा युतीचे पॅनल होण्याची चिन्हे असतानाच शिवसेनेत फाटाफूट होऊन शेतकरी विकास पॅनलकडे माजीमंत्री बबनराव घोलप व उपजिल्हाप्रमुख जगन आगळे वगळता अन्य पदाधिकार्यांनी माजी खासदार देवीदास पिंगळेंच्या आपलं पॅनलशी घरोबा केल्याचे चित्र आहे, तर भाजपाचे आमदार अपूर्व हिरे यांनी माघार घेतल्याने व दोघा उमेदवारांनी शेतकरी विकासची वाट पकडल्याने भाजपाही एकाकी पडल्याचे चित्र आहे.
दुपारी देवीदास पिंगळे यांनी त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांची घोषणा केली. त्यात सोसायटी गटातून देवीदास पिंगळे, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, आत्माराम दाते, युवराज कोठुळे, प्रभाकर मुळाणे, संतोष डोमे, इतर मागास प्रवर्गातून दिलीप थेटे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून विश्वास नागरे, महिला राखीव गटातून ताराबाई माळेकर व विमलताई जुंद्रे, ग्रामपंचायत गटातून संजय तुंगार, रवींद्र भोये, भाऊसाहेब खांडबहाले, श्याम भास्कर गावित यांना, तर व्यापारी-आडते गटातून मोहनराज मोराडे व जगदीश अपसुंदे यांचा समावेश आहे. यावेळी देवीदास पिंगळे यांनी राज्य शिखर बँकेच्या वतीने विकण्यात आलेल्या गाळ्यांपोटी लिलावातून जमा झालेली ७४ कोटींची रक्कम शिखर बॅँकेत भरल्याने आजमितीस बाजार समिती कर्जमुक्त असल्याचे सांगितले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, पेठ शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर गावित, शंकर धनवटे, हिरामण खोसकर, दिलीप थेटे, विनायक माळेकर, तुकाराम पेखले, चंद्रकांत निकम यांच्यासह पॅनलमधील बहुसंख्य उमेदवार हजर होते, तर दुपारी शेतकरी विकास पॅनलने जिल्हाधिकारी आवारातच पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली. त्यात सर्वसाधारण गटातून महापालिका स्थायी समिती साभपती शिवाजी चंुबळे, मुरलीधर पाटी,. संपतराव सकाळे, रघुनाथ फडोळ, नामदेव आगळे, सुरेश निमसे, अशोक ठुबे, महिला राखीव गटातून-चंद्रकला मेढे व सुवर्णा बोडके, इतर मागास प्रवर्ग-सुनील खोडे, भटक्या जमाती गटातून अंबादास घुगे, ग्रामपंचायत गटातून राजाराम फडोळ, रवींद्र राऊतमाळे, रमेश गालट, रूपाली जाधव, व्यापारी व आडते गटातून संदीप पाटील व ताराचंद दलवाणी यांचा समावेश आहे. यावेळी शिवाजी चुंबळे, मुरलीधर पाटील, संपतराव सकाळे, दामोदर मानकर यांच्यासह पॅनलचे बहुसंख्य उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)