‘स्वीकृत’ची नावे निश्चित

By admin | Published: January 16, 2016 12:01 AM2016-01-16T00:01:14+5:302016-01-16T00:01:14+5:30

आज फुटणार लॉटरी : रात्री उशिरापर्यंत इच्छुकांची घालमेल

The names of 'Approved' are fixed | ‘स्वीकृत’ची नावे निश्चित

‘स्वीकृत’ची नावे निश्चित

Next
>मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा
लातूर : शहरातील दयानंद विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त गुरूवारी प्रा़डॉ़ सूर्यनारायण रणसुभे यांचे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी : वाचन संस्कृतीचे महत्व या विषयावर व्याख्यान झाले़ अध्यक्षस्थानी प्रा़डॉ़ सिद्राम कटारे होते़ यावेळी प्रा़डॉ़ रणसुभे म्हणाले, व्यक्तिमत्व विकासात भाषा हा अत्यंत महत्वाचा घटक असतो़ आजच्या आधुनिक युगात बहुभाषिकता असणे गरजेचे आहे़ परंतू, मातृभाषेशिवाय व्यक्तिमत्व विकास व प्रगती साधणे अशक्य आहे़ राज्यातील नागरिकांनी मराठी भाषेची अभिवृद्धी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले़ पाहुण्यांचा परिचय रविना ढगे यांनी करून दिला़ सूत्रसंचालन प्रा़ मेघा पंडित यांनी केले़ आभार साक्षी अग्रवाल हिने मानले़ यावेळी प्रा़ गजानन बने, प्रा़डॉ़ चंद्रशेखर स्वामी आदी उपस्थित होते़


नामविस्तार दिन पानगावात साजरा
पानगाव : डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन गुरूवारी येथे साजरा करण्यात आला़
अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे अध्यक्ष किरण चव्हाण होते़ यावेळी नागनाथ चव्हाण, संदीपान वाघमारे, सिद्धेश्वर गालफाडे, शहनशहा शेख, किशोर हणमंते, संतोष गायकवाड, माधव सिरसाट आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमास सुहास कांबळे, प्रवीण आचार्य, रोहिदास आचार्य, निलेश आचार्य, अतुल आचार्य, वैभव कांबळे, शिलवंत क्षीरसागर, आदीनाथ आचार्य, किर्तीकुमार गायकवाड आदी उपस्थित होते़


शेलदरा ग्रामस्थांचे पाण्यासाठी उपोषण
टँकर सुरू करण्याची मागणी
वांजरवाडा : जळकोट तालुक्यातील शेलदरा येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ टँकरने पाणीपुरवठा करण्यात याव, अशी मागणी गेल्या दोन महिन्यापासून करण्यात येत असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे़ त्यामुळे अखेर सरपंच, उपसरपंचासह गावकर्‍यांनी जळकोट तहसील कार्यालयासमोर गुरूवारी उपोषण केले़
शेलदरा येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे़ गावची लोकसंख्या अडीच हजार असून, गेल्या चार महिन्यापासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ गावातील हातपंप बंद पडले असून, सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे़ नागरिकांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून ग्रामपंचायतीने पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली़ गेल्या दोन महिन्यापासून प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने अखेर सरपंच छकूबाई केंदे्र, उपसरपंच मल्हारी कांबळे, दत्तात्रय पवार, नागोराव गायकवाड, ज्ञानोबा गु˜े, उत्तम केंदे्र, माधव कांबळे, धोंडिराम पाटील, मुरलीधर केंद्रे, मारोती आगलावे, माधव काळे, साहेबराव काळे, नितीन मुंडे आदींनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले़ दरम्यान, तहसीलदारशिवनंदालंगडापूरेयांनीउपोषणकर्त्यांचीभेटघेऊनलवकरचटँकरनेपाणीपुरवठाहोईल,असेशआश्वासनदिले़

Web Title: The names of 'Approved' are fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.