मोदींनी मागविली संसदेत गैरहजर राहाणाऱ्या मंत्र्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 05:23 AM2019-07-17T05:23:52+5:302019-07-17T05:24:09+5:30

संसद अधिवेशन सुरु असताना दोन्ही सभागृहांत गैरहजर राहाणाºया केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले आहेत.

The names of minister absent in Modi's Parliament | मोदींनी मागविली संसदेत गैरहजर राहाणाऱ्या मंत्र्यांची नावे

मोदींनी मागविली संसदेत गैरहजर राहाणाऱ्या मंत्र्यांची नावे

Next

नवी दिल्ली : संसद अधिवेशन सुरु असताना दोन्ही सभागृहांत गैरहजर राहाणाºया केंद्रीय मंत्र्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भडकले आहेत. अशा मंत्र्याची नावे मोदींनी भाजप नेतृत्वाकडून मागवून घेतली. कर्तव्य टाळणाºया भाजप सदस्यांना मोदी यांनी खडसावण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.
भाजप संसदीय पक्षाच्या मंगळवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत मोदी म्हणाले की, पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ जुलै रोजी संपणार असले तरी गरज भासल्यास त्याची मुदत वाढविण्यातही येऊ शकते. संसदेत कामकाज सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून संसदेच्या एकातरी सभागृहात उपस्थित राहाणे आवश्यक आहे. त्यांना नेमून दिलेले कामकाज या मंत्र्यांनी पार पाडलेच पाहिजे.
या बैठकीनंतर त्यातील कामकाजाची माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. मोदी म्हणाले की, भाजप खासदारांनी आपापल्या मतदारसंघांच्या विकासासाठी तसेच क्षयरोग, कुष्ठरोग निवारणासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी झटावे. महात्मा गांधी यांनी त्या दिशेने केलेल्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी. क्षयरोगाचे जगातून २०३० सालापर्यंत उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. मात्र त्याच्या दोन वर्षे आधीच हे ध्येय भारताला साध्य करायचे आहे. सार्वत्रिक निवडणुकांत लोकसभेवर पहिल्यांदाच निवडून आलेल्या भाजप खासदारांची संख्या मोठी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावण्याबरोबरच जनतेच्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीही सजग राहावे. काम हीच या खासदारांची ओळख बनली पाहिजे.
>कामचुकार खासदारांवर भाजपची बारीक नजर
संसदेत गैैरहजर राहाणाºया खासदारांची मोदी यांनी २ जुलै रोजी एका बैैठकीत कानउघाडणी केली होती. त्यांनी सांगितले होते की, संसदेत अधिवेशन सुरु असताना दररोज भाजपचे किती खासदार, मंत्री सभागृहांत उपस्थित असतात यावर पक्षनेतृत्व बारीक नजर ठेवून आहे. या बैठकीनंतर तीन दिवसांनी भाजप खासदारांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत नियमीत हजर राहाण्यासाठी भाजप नेतृत्वाने व्हीप जारी केला होता.

Web Title: The names of minister absent in Modi's Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.