१५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हालचाली सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:57 IST2025-02-14T13:56:20+5:302025-02-14T13:57:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ते भारतात परत आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव निश्चित केले जाईल.

Names of 15 MLAs shortlisted... BJP starts moves for Delhi Chief Minister's post, BJP Swearing Ceremony PM Narendra Modi JP Nadda Amit Shah | १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हालचाली सुरू!

१५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट... दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून हालचाली सुरू!

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पुढील आठवड्यात दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडून १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. ते भारतात परत आल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम नाव निश्चित केले जाईल.

गृहमंत्री अमित शाह, जेपी नड्डा आणि भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठक होणार आहेत. या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी कोणाची निवड करण्यात येणार, हे ठरणार आहे. भाजपकडून निवडून आलेल्या ४८ आमदारांपैकी १५ आमदारांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. आता या १५ निवडलेल्या आमदारांच्या नावांमधून ९ नावे वगळून मुख्यमंत्री, मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित केले जाईल. 

यासोबतच, विधिमंडळ पक्षाची बैठक १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी होऊ शकते. दरम्यान, दिल्लीतील निवडणुकीचे निकाल ८ फेब्रुवारीला जाहीर झाले. यात भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या. या विजयानंतर भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यामुळे दिल्लीतील शपथविधी सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. आता नरेंद्र मोदींचा परदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होईल.

मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत सरकार स्थापनेच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्ये भाजपच्या अनेक आमदारांची नावे चर्चेत आहेत.  यामध्ये नवी दिल्ली मतदारसंघातून आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा यांचे नाव सर्वाधिक जास्त चर्चेत आहे. याचबरोबर, दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष विजेंदर गुप्ता, सतीश उपाध्याय, मनजिंदर सिंग सिरसा, पवन शर्मा, आशिष सूद, रेखा गुप्ता आणि शिखा राय यांचेही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Names of 15 MLAs shortlisted... BJP starts moves for Delhi Chief Minister's post, BJP Swearing Ceremony PM Narendra Modi JP Nadda Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.