आणखी काही भारतीयांची नावे समोर

By Admin | Published: April 6, 2016 04:46 AM2016-04-06T04:46:33+5:302016-04-06T04:46:33+5:30

पनामा प्रकरणात भारतातील बड्या हस्तींची नावे समोर आल्यानंतर आणखी काही नावे यात चर्चिली जात आहेत. कोण आहेत या व्यक्ती?

Names of some other Indian names | आणखी काही भारतीयांची नावे समोर

आणखी काही भारतीयांची नावे समोर

googlenewsNext

नवी दिल्ली : पनामा प्रकरणात भारतातील बड्या हस्तींची नावे समोर आल्यानंतर आणखी काही नावे यात चर्चिली जात आहेत. कोण आहेत या व्यक्ती?
अश्वनी कुमार मेहरा : मेहरा सन्स ज्वेलर्सचे मालक़ या कुटुंबाने १९९९ मध्ये बह्मास आणि ब्रिटिश आइसलँडमध्ये सात कंपन्या स्थापन केल्या, असे कागदपत्रावरून सांगितले जात आहे.
प्रतिक्रिया : आमच्या आयकर रिटर्नमध्ये याचा उल्लेख केलेला आहे.
गौतम आणि करण थापर (क्रॉम्प्टन समूह) गौतम आणि करण थापर यांनी २००५ मध्ये पनामात खासगी फाऊंडेशन स्थापन केल्याचे सांंगण्यात येत आहे.
प्रतिक्रिया : थापर यांनी सांगितले की, आम्ही कोणतेही फाऊंडेशन स्थापन केले नाही; पण त्यांच्या पत्नी जर्मन नागरिक स्टेपनी जॅकलिन या फाऊंडेशनच्या लाभार्थी आहेत.
गौतम सिंघल : जेफ मॉर्गन कॅपिटल लिमिटेड या कंपनीची ब्रिटिश आइसलँडमध्ये स्थापना.
प्रतिक्रिया : या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही.
प्रभाश संखला : मध्यप्रदेशमधील निवृत्त सरकारी कर्मचारी. पनामात २०१२ मध्ये लोटस हॉरिझॉन या कंपनीची स्थापना.
प्रतिक्रिया : माझे जावई व्यवसायाच्या निमित्ताने जगभरात फिरत असतात. त्यांचे अनेक व्यवसाय आहेत. या कंपनीचा मी मानद संचालक आहे. तथापि, या कंपनीत मी एक पैसाही गुंतविलेला नाही.
विनोद रामचंद्र जाधव : पुण्यातील सावा हेल्थकेअरचे अध्यक्ष. ब्रिटिश आइसलँड येथील एका कंपनीचे संचालक असल्याचे कागदपत्रावरून सांगितले जात आहे.
प्रतिक्रिया : आमच्या कंपन्यांची माहिती वेळोवेळी जाहीर केली आहे.
अशोक मल्होत्रा : परदेशात ई अ‍ॅण्ड पी आॅनलुकर्स लि.ची स्थापना.
रंजीव दहुजा, कपिल सेन गोएल : ह्युंदाई आणि टाटा मोटर्सचे डीलर.
विवेक जैन : मध्यप्रदेशात यांचे कृषी अवजारांचे दुकान आहे. याशिवाय सतीश समतानी, विशलव बहादूर आणि हरीश मोहानी यांची नावे आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Names of some other Indian names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.