वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गावरील 'ही' आहेत प्रस्तावित स्टेशनांची नावं ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 10:26 PM2018-08-01T22:26:08+5:302018-08-01T23:56:08+5:30
कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
नवी दिल्ली- कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत आयोजित कोकण रेल्वे आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला रेल्वे मंडळाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
103 किलोमीटर लांबीचा हा मार्ग कोकण रेल्वेबरोबरच या क्षेत्राच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी लाभदायक ठरेल असे प्रभू यांनी यावेळी सांगितले. 2022 सालापर्यंत तो पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गावर कोकण रेल्वे धावू लागल्यानंतर या प्रकल्पालाही त्याचा लाभ होणार आहे.
कोकण रेल्वेच्या सेवेत सुधारणा करतानाच अधिकाअधिक गावे कोकण रेल्वेमार्गाशी जोडण्यासाठी नवीन स्थानके उभारली जात असल्याची माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितली. या प्रस्तावित रेल्वे स्थानकांची नावं लोकमतच्या हाती लागली आहेत. वैभववाडी, उपळे, सैतवडे, भूतलवाडी, कळे, भुये, कसबा बावडा, रेल्वे गुड्स, मार्केट यार्ड अशी नावे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहेत.
Reviewed the work plans for the construction of the 103 km. Kolhapur-Vaibhavwadi section of Konkan Railway, which will begin very soon. The project will be a major game changer for the overall economy of Maharashtra linking the coastal region with Western Maharashtra. (1/3) pic.twitter.com/Kq2aimcO4o
— Suresh Prabhu (@sureshpprabhu) August 1, 2018