रेस कोर्स रोडचे ‘लोककल्याण मार्ग’ नामकरण
By admin | Published: September 22, 2016 04:09 AM2016-09-22T04:09:38+5:302016-09-22T04:09:38+5:30
भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रेस कोर्स रोडचे नाव बदलण्यात आले
नवी दिल्ली : भारताच्या पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या रेस कोर्स रोडचे नाव बदलण्यात आले असून, तो रस्ता आणि लोककल्याण मार्ग या नावाने ओळखला जाईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या नवी दिल्ली परिषदेच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
रेस कोर्स रोडचे नाव बदलून एकात्मता मार्ग यावे, अशी मागणी भाजपाच्या दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखी यांनी केली होती. भारतीय जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारसरणीला धरून एकात्मता मार्ग हे नाव देणे योग्य ठरेल आणि ते भारतीय संस्कृतीला अनुसरून असेल, असे खा. लेखी यांनी महापालिकेला लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. (वृत्तसंस्था)