नमो शंभरी!
By admin | Published: August 31, 2014 03:19 AM2014-08-31T03:19:50+5:302014-08-31T03:19:50+5:30
नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे.
Next
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारला सत्तेवर येऊन येत्या
2 सप्टेंबरला 100 दिवस पूर्ण होतील. काही महत्त्वाचे निर्णय मोदी सरकारने घेतलेही.
नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही आहेत. महागाईसारख्या मुद्दय़ावर अजून मोदी सरकारला उपाय शोधता आलेला नाही, हेही वास्तव आहे. 1क्क् दिवस पूर्ण करणा:या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचा हा लेखाजोखा..
ठोस भूमिका नाहीच
शेजारी पाकिस्तानच्या संदर्भात या सरकारकडे कोणतीही ठोस आणि निश्चित भूमिका नाही. एकाचवेळी दहशतवाद आणि चर्चा होऊ शकत नाही, असे हेच लोक गेली 1क् वर्षे सातत्याने सांगत होते. पण सत्ता हातात घेण्यापूर्वीच यांनी आपल्या शपथविधीसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आग्रहाचे निमंत्रण पाठविले. पण हे निमंत्रण तिथे जाऊन पोहोचण्याच्या आधीच तेथील आयएसआय आणि तिच्या साथीदारांनी हेरात येथील भारतीय दूतावासावर हल्ला चढविला.
पाकचे हल्लेही सुरूच
पाकिस्तानातील 26/11 संबंधीच्या एका खटल्यातून हाफीझ सईदचे नाव वगळण्यात आले व त्या खटल्याची सुनावणीच तहकूब करण्यात आली; कारण सुनावणी करणा:यांना धमक्या दिल्या गेल्या. एवढे सारे होऊन आपले सरकार मुके आणि बहिरे होऊन बसले. त्यामुळे आयएसआय व तिच्या हस्तकांना भारताशी छुपे युद्ध सुरू ठेवायला प्रोत्साहनच मिळाले. तुमच्याकडे जर पाकिस्तानबाबत कोणतीही ठोस भूमिका नसेल तर हे असे होणारच.
बत्ती गुल कारभार
देशातील प्रत्येक खेडय़ात रात्रंदिवस वीज देण्याचे त्यांचे आश्वासन होते. पण हे लोक सत्तेत येऊन आठवडा होत नाही तोच खुद्द देशाच्या राजधानीत काय झाले, तर अध्र्याहून अधिक वस्त्यांना विजेवाचून राहावे लागले. देशातील बव्हंशी राज्ये वीजटंचाईचा मुकाबला करीत आहेत. त्यामुळे या ‘बत्ती गुल सरकार’च्या कारभारापायी येणा:या वाईट दिवसांच्या कल्पनेनेच प्रत्येकाला कापरे भरणार आहे.