नाना-नानी पार्कचे काम लागणार मार्गी पुढाकार : महापौरांनी आयुक्तांसह घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
By admin | Published: March 15, 2016 12:34 AM2016-03-15T00:34:09+5:302016-03-15T00:34:09+5:30
जळगाव : मनपाने काव्यरत्नावली चौकातील पोलीस अधीक्षक निवासस्थाना शेजारील जागेत नाना-नानी पार्कचे काम सुरू करण्यासाठी तेथील पोलीस विभागाच्या कर्मचार्याचे निवासस्थान हटविण्यासंदर्भात महापौर नितीन ला यांनी आयुक्तांसह जाऊन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. सुपेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नाना-नानी पार्कचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
Next
ज गाव : मनपाने काव्यरत्नावली चौकातील पोलीस अधीक्षक निवासस्थाना शेजारील जागेत नाना-नानी पार्कचे काम सुरू करण्यासाठी तेथील पोलीस विभागाच्या कर्मचार्याचे निवासस्थान हटविण्यासंदर्भात महापौर नितीन ला यांनी आयुक्तांसह जाऊन पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. सुपेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नाना-नानी पार्कचे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपाने काव्य रस्त्यावली चौक ते शिरसोली नाका रस्त्याचे रुंदीकरण केल्याने पोलीस अधीक्षक निवासस्थानालगतच्या जागेचे अधिग्रहण केले आहे. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक निवासस्थानासाठी सध्या असलेल्या कुंपण भिंती कायम ठेवतच आतून अधिग्रहीत केलेल्या जागेच्या कडेने दुसरी कुंपण भिंत आधीच बांधून दिली आहे. केवळ या जागेत असलेले सर्व्हंट क्वॉर्टर (कर्मचारी निवासस्थान) काढणे बाकी आहे. त्यासाठी मनपाने दुसरे निवासस्थानही बांधून दिले आहे. मात्र त्यातील काही काम बाकी आहे. शहर अभियंता करणार पाहणीमहापौर ला, आयुक्त संजय कापडणीस, उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समिती सभापती नितीन बरडे आदींनी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत किरकोळ सुधारणा सुचविल्या. त्यानुसार शहर अभियंता मंगळवारी सकाळी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील. तसेच कर्मचारी निवासस्थानातील किरकोळ राहिलेले काम तसेच कुंपण भिंत उंच करण्याचे काम केले जाणार आहे. ----- इन्फो---जैन इरिगेशनने दिला होता प्रस्तावमहापौर ला यांनी सांगितले की, काव्य रत्नावली चौक जैन इरिगेशननेच विकसित करण्यासाठी घेतला असून जैन उद्योग समूहानेच या ठिकाणी नाना-नानी पार्क बांधून देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याअनुषंगाने जैन उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती ला यांनी दिली. ---- इन्फो---पहिल्याच दिवशी लागले कामालामहापौर, उपमहापौर हे गुरुवारी निवड झाल्यावर शुक्रवारी बाहेरगावी होते. तर शनिवार व रविवारची सुी असल्याने सोमवारी कामकाजाचा त्यांचा पहिलाच दिवस होता. मात्र पहिल्याच दिवसापासून दोन्ही पदाधिकारी कामाला लागल्याचे दिसून आले. पहिला दिवस असल्याने सर्व अधिकारी, व्यापारी, कर्मचारी पुष्पगुच्छ घेऊन महापौर व उपमहापौरांच्या सत्कारासाठी येत होते. त्यातही समस्या घेऊन आलेल्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम नूतन महापौरांकडून सुरू होते. उपमहापौरांनी तर जाहीर केलेल्या विषयांच्या अनुषंगाने कामकाजाचे नियोजन करण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात केली आहे. महापौरांनी सायंकाळी आयुक्तांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन गेल्या काही वर्षांपासून रखडलेला विषय मार्गी लावण्याच्या दृष्टीने पहिल्याच दिवशी पाऊल उचलले.