नांदेड-दिल्ली-अमृतसर रोज विमानसेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 04:12 AM2019-07-25T04:12:53+5:302019-07-25T04:12:59+5:30
खा. हेमंत पाटील, प्रतापराव चिखलीकर यांना केंद्राचे आश्वासन
नवी दिल्ली : शीख धर्मियांसाठी अमृतसर पाठोपाठ नांदेड शहर महत्त्वाचे आहे. नांदेडहून दिल्ली-अमृतसर विमानसेवा नियमित सुरु करावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आठवड्यातून तीन दिवस असणारी ही विमानसेवा लवकरच दररोज उपलब्ध होईल, असे सकारात्मक आश्वासन केंद्रीय गृहनिर्माण, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीपसिंह पुरी यांनी दिले.
हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी ही मागणी रेटून धरली होती. नुकतीच त्यांनी पुरी यांची भेट घेत त्यांना मागणीचे निवेदन सादर केले होते. डॉ.प्रीतम मुंडे, डॉ.भारती पवार तसेच धैर्यशील माने यावेळी उपस्थित होते.
नांदेड-पुणे-मुंबई व मुंबई-पुणे-नांदेड विमानसेवा सुरु करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मुंबई तसेच हैदराबाद विमानतळावर विमानांची वर्दळ जास्त असल्याने विमान पार्किंगसाठी जास्तीचे दर मोजावे लागतात. दर कमी करण्यासाठी नांदेड विमानतळावर पार्किंग हब उभारण्यात यावे. नांदेड विमानतळ त्यामुळे इतर शहरांशी जोडले जाईल, अशी मागणी ही खासदारांच्या शिष्ठमंडळाने केली आहे. यासंबंधी सकारात्मक निर्णय घेवू असे आश्वासन पूरी यांनी दिले.
नांदेड शहराला विशेष धार्मिक महत्व आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या चरस्पशार्ने ही भूमी पावन, पवित्र झाली आहे. शीख धमिंर्यांच्या पाच तख्तापैकी एक इथे आहे. स्वाभाविक शहरासोबत शीख बांधवांच्या भावना जुळल्या आहेत. शीखांचे दहावे गुरु, गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या आयुष्याचा शेवटचा काळ इथे व्यथित केला. ह्यतख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिबह्ण च्या दर्शनासाठी लाखो भाविक दररोज शहरात दाखल होतात.
नांदेडवरुन दिल्ली-अमृतसरसाठी आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानसेवा दररोज सुरु करण्याची मागणी त्यामुळे करण्यात येत होती. मागणीला तत्काळ मंजूरी देण्यात आली आहे. सरकारच्या सकारात्मक आश्वासनामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे.
नांदेड-दिल्ली-अमृतसर विमानसेवा नियमित करण्याची मागणी गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. मागणीवर आता केंद्र सरकारने सकारात्मकता दर्र्शवली आहे. थेट अमृतसरसोबत नांदेड आता नियमित पणे जोडले जाईल, त्यामुळे शीख बांधवांना त्यांच्या दक्षिण काशीचे दर्शन घेता येईल. नांदेड तसेच दिल्लीच्या प्रवाशांसाठी ही विमानसेवेचा लाभ होईल.नांदेड, लातूर, हिंगोलीच्या खासदारांच्या संयुक्त मागणीला यश मिळाले आहे.
-प्रतापराव चिखलीकर, खासदार, नांदेड