Nandini Milk Row: “विमानतळ, बंदरं, बँक हिसकावून घेतली, आता मोदीजी नंदिनी दूधही हिसकावून घेणार का?”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 02:39 PM2023-04-09T14:39:33+5:302023-04-09T14:41:17+5:30
काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल. कर्नाटकात अमूलच्या एन्ट्रीच्या बातम्यांनंतर त्या ठिकाणी विरोध सुरू झाला आहे.
दक्षिण भारत सध्या चर्चेत आहे. याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे पुढील महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका आहेत. दुसरं म्हणजे दूध आणि दही. पहिलं कारण समजण्यासारखं आहे. निवडणुका असल्या तर चर्चा ही होणारच. पण सध्या दूध आणि दही यावरून वाद सुरू आहे.
वास्तविक, अमूलला कर्नाटकातील बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे. कर्नाटक दूध महासंघाचं नंदिनी दूध येथे आधीच बाजारात उपलब्ध आहे. आता अमूलच्या आगमनानं केएमएफच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. यावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. कर्नाटक निवडणुकीच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसं राजकारणही तीव्र होताना दिसत आहे. कर्नाटकात विरोधकांकडे अनेक मुद्दे असले तरी यावेळी नंदिनी विरुद्ध अमूल ही लढाई तीव्र झाली आहे. “”तुमचा कर्नाटकात येण्याचा उद्देश कर्नाटकला देणं आहे की लुटणं?,” असं म्हणत सिद्धरामय्या यांनी मोदींवर टीकेचा बाण सोडला.
भाजपवर हल्लाबोल
“येथील बँक, बंदर, विमानतळ यापूर्वीच हिसकावून घेतले आहे. आता तुम्ही आमच्याकडून नंदिनीला चोरायचा प्रयत्न करत आहात का? आमची विजया बँक गुजरातच्या बडोदा बँकेत विलीन झाली. कर्नाटकातील बंदरं आणि विमानतळ गुजरातच्या अदानींकडे सोपवण्यात आली. आता गुजरातची अमूल आमची केएमएफ ताब्यात घेण्यास तयार आहे,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
येथील बँक, बंदर, विमानतळ यापूर्वीच हिसकावून घेतले आहे. आता तु्म्ही आमच्याकडून नंदिनीला हिसकावण्याचा प्रयत्न करत आहात का? आमची विजया बँक गुजरातच्या बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाली. कर्नाटकातील बंदरं आणि विमानतळ गुजरातच्या अदानींकडे सोपवण्यात आली. आता गुजरातची अमूल आमची केएमएफ ताब्यात घेण्यास तयार आहे,’’असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला.
Prime Minister @narendramodi avare,
— Siddaramaiah (@siddaramaiah) April 9, 2023
Is your purpose of coming to Karnataka is to give to Karnataka or to loot from Karnataka?
You have already stolen banks, ports & airports from Kannadigas. Are you now trying to steal Nandini (KMF) from us?#AnswerMadiModi#SaveNandinipic.twitter.com/LooivhuEn3
‘आम्ही शत्रू आहोत का?’
आम्ही गुजरातींचे शत्रू आहोत का? असा सवालही त्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केला. निवडणुकीच्या काळात नंदिनी दूधाचा मुद्दा तापला आहे. विरोधकांनी या मुद्दा उचलून धरला असून एन्ट्री घेतानाच अमूलला मोठा झटका बसलाय. बंगळुरू हॉटेल्स असोसिएशननं अमूलला बॉयकॉट केलं आहे. आपण नंदिनी दूधच वापरणार आहोत असं त्यांनी म्हटलंय.