नजनपाटील यांची पावणे दोन वर्षात तीन वेळा बदली गौडबंगाल : आता किरकोळ रजेवर की सक्तीच्या; चर्चेला उधाण
By admin | Published: July 16, 2016 12:38 AM2016-07-16T00:38:41+5:302016-07-16T00:38:41+5:30
जळगाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.
Next
ज गाव : चोपड्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची पावणे दोन वर्षाच्या काळात तीन वेळा बदली झाली आहे. एका पोलीस स्टेशनला नेमणूक झाल्यानंतर नियमानुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर बदली होणे अपेक्षित असते. नजनपाटील मात्र, या नियमावलीला अपवाद ठरले आहेत. दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची वेगवेगळ्या कारणाने तीन वेळा उचलबांगडी झाली आहे.जळगाव शहर पोलीस स्टेशनला १९ ऑगस्ट २०१४ रोजी नजनपाटील यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर अवघ्या दहा महिन्यात त्यांची उचलबांगडी झाली. १५ जून २०१५ रोजी त्यांना भुसावळ बाजारपेठला पाठविण्यात आले. शहर पोलीस स्टेशनला शिवसेनेचे गजानन मालपुरे यांच्याशी त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हा वाद न्यायालयात पोहचला होता. म्हणून १६ जून २०१५ रोजी नजनपाटील यांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला पाठविण्यात आले होते. भुसावळची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे कारण सांगत तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक सुपेकर यांनी आपल्याला भुसावळला पाठविले होते, असा दावा नजनपाटील यांनी तेव्हा केला होता. नंतर भुसावळहूनही त्यांची दहाच महिन्यात नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. आमदार संजय सावकारे यांचे समर्थक पिंटू कोठारी यांच्यावर झालेल्या कारवाईतून सावकारे व नजनपाटील यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यातूनच त्यांची भुसावळहून उचलबांगडी झाल्याचे बोलले जात होते. तर तत्कालीन पालकमंत्री खडसेंच्या मर्जीतील पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासाठी नजनपाटील यांना हटविण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती.भाजपा कार्यकर्त्यांमुळे आले अडचणीतकाही दिवस नियंत्रण कक्षात काम केल्यानंतर ३० मे २०१६ रोजी नजनपाटील यांची चोपडा शहर पोलीस स्टेशनला नेमणूक करण्यात आली. तेथे १३ जून रोजी गायींचा ट्रक पकडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ट्रक जाळला होता. त्या वादातून भाजपा कार्यकर्त्यांशी नजनपाटील यांचे बिनसले. म्हणून भाजपा कार्यकर्त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे त्यांच्या तक्रारी केल्या. त्यानंतर ते रजेवर गेले आहेत.