10 वर्षांच्या मुलीवर 4 दिवस केला नराधमांनी सामूहिक बलात्कार
By admin | Published: February 14, 2017 01:16 PM2017-02-14T13:16:46+5:302017-02-14T13:51:32+5:30
गुडगाव येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर सतत चार दिवस सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गुडगाव येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर सतत चार दिवस सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सुशांत लोक परिसरातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही नराधमांनी मुलीला सेक्टर 43 मधील एका झोपडपट्टीत तोंड आणि हातपाय बांधून ठेवले. चार दिवस तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र मुलीच्या तोंडून फेस येऊन ती बेशुद्ध झाली तेव्हा आरोपींची घाबरगुंडी उडाली.
यावेळी तिघांनी गळा दाबून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, जेणेकरुन तिची ओळख पटणार नाही. यानंतर तिचा मृतदेह पाण्याच्या रिकाम्या टाकीमध्ये फेकला. असा किळसवाणा आणि माणुसकीचा काळीमा फासणारं कृत्य या तिघांनी केले. हत्या करण्यात आलेली मुलगी वजरीबाद गावात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होती. मूळची पश्चिम बंगाल येथील रहिवासी असलेली या मुलीचे आई-वडील मजुरीचे काम करायचे. दरम्यान 16 जानेवारी रोजी मुलगी अचानक बेपत्ता झाली. जवळपासच्या परिसरात पोलिसांनी शोधाशोध केली मात्र तिचा काहीही पत्ता लागला नाही.
यानंतर 23 जानेवारी रोजी क्रिकेट खेळणा-या काही मुलांना पाण्याच्या टाकीमध्ये मृतदेह आढळला. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.तपासणीदरम्यान एका साक्षीदाराने पोलिसांना सांगितले की, तीन जण त्या मुलीला एका काळ्या रंगाच्या स्कोडा कारमध्ये घेऊन गेले. शिवाय सुरक्षा रक्षकानेही स्कोडा कारला आसपासच्या परिसरात पाहिले होते.
कार रेजिस्ट्रेशन क्रमांकाच्या आधारे पोलीस मालकापर्यंत पोहोचली आणि नंतर कारचालक एजाद मलिक (26)बाबतची माहिती समोर आली. एजाद हा मूळचा पश्चिम बंगालमधील रहिवासी असल्याची माहिती चौकशीदरम्यान समोर आली.
डीसीपी दीपक साहरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलिकला 11 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर कुकृत्यात सहभागी असलेले त्याचे साथीदार मुख्तार अली (30) आणि जलील (22) यांच्या नावाचाही खुलासा केला. त्याच्या खुलाशामुळे दोन्ही आरोपींच्या सोमवारी मुसक्या आवळण्यात आल्या.
एजाद ड्रायव्हर, जलील ऑटो ड्रायव्हर आणि अली फेरीवाला होता. पोलिसांनी सांगितले की, अलीची मुलीसोबत ओळख होती, त्यानं 300 रुपये देण्याच्या बहाण्याने मुलीला कारमध्ये बोलावले. चिमुकलीवर अत्याचार करताना या तिन्ही नराधमांनी अमली पदार्थाचं सेवनही केले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली