नारायण शेी याची जामिनावर सुटका रेल्वे प्रवासातील ॲसीड प्रकरण : पाच जणांना घरी सोेडले, एकावर उपचार सुरु
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM2014-12-20T22:27:19+5:302014-12-20T22:27:19+5:30
डोंबिवली : रेल्वे प्रवासात ॲसीडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी घडली. डोंबिवलीतील नारायण शेी(६०) या प्रवासाच्या सामानामध्ये ही ॲसीड/केमीकलची बाटली होती, त्यास ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती, शनिवारी त्यास कल्याणच्या रेल्वे न्यायालायात नेले असता, त्याची वैयक्तिक जातमुचलक्यान्वये जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.राणे यांनी सांगितले.
Next
ड ंबिवली : रेल्वे प्रवासात ॲसीडची बाटली फुटून सहा जण जखमी झाल्याची घटना मुलुंड-ठाणे मार्गावर शुक्रवारी घडली. डोंबिवलीतील नारायण शेी(६०) या प्रवासाच्या सामानामध्ये ही ॲसीड/केमीकलची बाटली होती, त्यास ठाणे लोहमार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती, शनिवारी त्यास कल्याणच्या रेल्वे न्यायालायात नेले असता, त्याची वैयक्तिक जातमुचलक्यान्वये जामिनावर सुटका करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.राणे यांनी सांगितले.जखमींमध्ये विजय वर्हाडकर (१९) वगळता तर दिनेश सिंग(४०) आणि सरस्वती सिंग(३५) तर सुनिल, सयाजी पालसे हे देखिल जखमी होते, त्यांना शुक्रवारीच सिव्हील रुग्णालयातून उपचारार्थ सोडण्यात आल्याचेही राणे म्हणाले. सीएसटीहून अंबरनाथच्या दिशेने धीम्या डाऊन मार्गावरुन येणा-या गाडीत नारायण शेी हा प्रवासी घाटकोपर स्थानकात चढला. प्रवासात मुलुंड स्थानकादरम्यान त्याला ॲसीडची पिशवी फुटल्याचे ध्यान्यात आले, पिशवीतून धुर बाहेर येऊ लागल्याने त्याने ती पिशवी तात्काळ बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये या सर्व प्रवाशांच्या अंगावर ॲसीडचे थेंब/शिंतोडे पडल्याने ते जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ठाणे स्थानकात आल्यावर ही घटना उघडकीस आले, आणि त्यानंतर तातडीने सर्वांना उपचारार्थ सिव्हील रुग्णालयात हलविण्यात आले. या संदर्भात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ए.एस.राणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. वाजे हे अधिक तपास करीत असल्याचे पी.व्ही. मोडक यांनी सांगितले. न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख कोणती दिली याबाबतची माहिती मात्र मिळू शकली नाही.............वाचली- नारायण जाधव