Narco Terrorism: रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 08:38 PM2023-04-09T20:38:48+5:302023-04-09T20:39:17+5:30

जवानांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत.

Narco Terrorism: pakistani trying to enter India ; one killed and two arrested | Narco Terrorism: रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले

Narco Terrorism: रात्रीच्या अंधारात भारतात घुसण्याचा प्रयत्न; एकाचा एनकाउंटर दोघांना पकडले

googlenewsNext


Pakistani Terrorist Arrested by Indian Army: पाकिस्तानकडूनभारतात सातत्याने नार्को टेररिझमला प्रोत्साहन दिले जात आहे. पाकिस्तानातून अनेकदा ड्रोनद्वारे किंवा लोकांच्या माध्यमातून भारतात घुसखोरी केली जात आहे. पण प्रत्येकवेळी भारतीय लष्करही हे प्रयत्न हाणून पाडत आहेत. आता पुन्हा एकदा भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. 

यावेळी इतर दोन दहशतवाद्यांना जिवंत पकडले असून, त्यांच्याकडून ड्रग्जची मोठी खेपही जप्त करण्यात आली आहे. लष्कराने जिवंत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एकाच्या पायातही गोळी लागली आहे. पाकिस्तानने काल रात्री तिन्ही घुसखोरांना भारतीय हद्दीत पाठवले होते. मात्र लष्कराच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. दोन्ही दहशतवादी पीओकेचे रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

पहाटे 2.15 वाजता ते घुसखोरीचा प्रयत्न 
लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, पहाटे 2.15 च्या सुमारास तीन दहशतवादी शाहपूर सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करत होते. नियंत्रण रेषेवर पहारा देणाऱ्या लष्कराच्या जवानांनी या दहशतवाद्यांना सीमेवर प्रवेश करताना पाहिले तेव्हा त्यांनी लगेच गोळीबार केला. या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला, तर दुसऱ्याच्या पायाला गोळी लागली. दोन्ही दहशतवादी पळून गेले. पण अखेर लष्कराने दोघांनाही अटक केली.

Web Title: Narco Terrorism: pakistani trying to enter India ; one killed and two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.