PM मोदींच्या दौऱ्यापूर्वीच अमेरीकेकडून मिळाले 8300 कोटींचे रिटर्न गिफ्ट; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 04:55 PM2023-06-16T16:55:36+5:302023-06-16T16:56:11+5:30

Narendra Modi America Visit : नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ला मोठे बळ मिळणार.

Narendra Modi America Visit: Return gift of 8300 crores received from America before PM Narendra Modi's visit; see... | PM मोदींच्या दौऱ्यापूर्वीच अमेरीकेकडून मिळाले 8300 कोटींचे रिटर्न गिफ्ट; पाहा...

PM मोदींच्या दौऱ्यापूर्वीच अमेरीकेकडून मिळाले 8300 कोटींचे रिटर्न गिफ्ट; पाहा...

googlenewsNext

Narendra Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वीच देशासाठी एक मोठी बातमी आली आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भारताला एक अब्ज डॉलर्सचे रिटर्न गिफ्ट मिळाले आहे. अमेरिकन 'चिप'मेकर मायक्रोन टेक्नॉलॉजीने एक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे, जी येत्या काळात 2 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे अमेरिकन कंपन्यांनी भारतावर विश्वास दाखवायला सुरुवात केली आहे. सेमीकंडक्टरच्या बाबतीत जगाने चीनवर अवलंबून राहू नये, अशी अमेरिकेची इच्छा आहे. अशा परिस्थितीत जागतिक सेमीकंडक्टर बाजाराचे नेतृत्व भारताकडे सोपवण्याची तयारी सुरू आहे. या कारणास्तव भारत सरकारने भारतीय चिप निर्मात्यांना 10 अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

दोन अब्ज डॉलर्सचा करार होऊ शकतो
मीडिया रिपोर्टनुसार, तज्ञांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाताच या कराराची घोषणा केली जाऊ शकते. एक अब्ज डॉलर्सची ही रक्कम दोन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. कराराला अंतिम स्वरूप देण्याची तयारी सुरू आहे. हा करार नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ला मोठे बळ देणारा ठरणार आहे. तसेच, वॉशिंग्टनला चीनबाहेर सप्लाय चेन मजबूत करण्याची संधी मिळेल.

चीनमध्येही 600 मिलियनची गुंतवणूक
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी नवी दिल्लीत सांगितले की, दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान व्यापारातील अडथळे दूर करणे हा मोदींच्या दौऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. दुसरीकडे, मायक्रोनने शुक्रवारी आपल्या चीनी प्लांटमध्ये नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि स्थानिक बाजारपेठेला पाठिंबा देण्यासाठी $600 मिलियन गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या करारावर भारताच्या तंत्रज्ञान मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही आणि मायक्रोननेदेखील याबद्दल कोणतेही भाष्य केलेले नाही.

जपानमध्ये उभारला जाणार NextGen प्लांट
वाढत्या चिनी तणावामुळे तैवानसारख्या आशियाई उत्पादन केंद्रांवर जगाचे अवलंबित्व कमी होत असल्याने अमेरिका प्रगत चिपमेकिंगमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेतील सर्वात मोठी चिप निर्माता कंपनी मायक्रोनने जपानमध्ये उभारल्या जाणार्‍या $3.6 अब्जाच्या नेक्स्टजेन प्लांटसाठी आर्थिक पाठबळही मिळवले आहे. 21 जून रोजी मोदींचा पहिला औपचारिक दौरा सुरू होत आहे. दुसऱ्या दिवशी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाउसमध्ये त्यांच्यासाठी मेजवानीचे आयोजन करतील. पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसलाही संबोधित करणार आहेत. 
 

Web Title: Narendra Modi America Visit: Return gift of 8300 crores received from America before PM Narendra Modi's visit; see...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.