पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 11:14 AM2019-06-24T11:14:40+5:302019-06-24T11:30:55+5:30

मोदींचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून मोदींचे ११ कोटी फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत.

narendra modi amit shah iphonex apple smartphone | पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर

पंतप्रधान मोदी, अमित शाह 'या' स्मार्ट फोनचा करतात वापर

Next

नवी दिल्ली - सध्याच्या काळात तुरळकच लोक असतील जे स्मार्टफोनचा वापर करत नाही. सहाजिकच देशातील सर्वात शक्तीशाली नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणता स्मार्टफोन वापरतात, याचं सर्वांनाच कुतुहल असणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह स्मार्टफोनच्या मदतीने कामावर लक्ष ठेवतात.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रीमंडळातील अनेक नेते टेक्नोसेव्ही आहेत. तसेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टीव्ह असतात. या नेत्यांकडून सोशल मीडियावर एक्टीव्ह राहण्यासाठी एप्पल आणि अँड्रोईडच्या अपडेटेड व्हर्जनचा वापर कऱण्यात येतो. केंद्रीयमंत्री अमित शाह नुकताच आलेला एप्पल एक्सएस या फोनचा वापर करतात. 'आयएनएस'ने दिलेल्या वृत्तानुसार अमित शाह खासदारांशी संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि व्हॉट्स एपचा वापर करतात. शाह यांचे ट्विटरवर १.४ कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीन आणि दुबईच्या दौऱ्याच्या वेळी आयफोन ६ फोनचा वापर करताना पाहण्यात आले होते. पंतप्रधान मोदी सुरक्षेच्या कारणांमुळे एप्पलचा सर्वोत्तम फोन वापरतात. मोदींचे ट्विटरवर ४.८२ कोटी फॉलोवर्स आहेत. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर मिळून मोदींचे ११ कोटी फॉलोवर्स आहेत. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ९.६ कोटी फॉलोवर्स आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान दोन स्मार्टफोनचा वापर करतात. यामध्ये एक स्मार्टफोन तर दुसरा एँड्रोईड फोन आहे. त्यांचे ट्विटरवर ११ लाख फॉलोवर्स आहेत. तर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आपल्या कार्यालयाच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकला प्राधान्य देत आहेत. गडकरी यांचे ट्विटरवर ५१.५ लाख फॉलोवर्स आहेत.

Web Title: narendra modi amit shah iphonex apple smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.