एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 11:16 AM2020-06-17T11:16:49+5:302020-06-17T11:27:18+5:30

कोरोनाच्या संकटात मोदी सरकारला अनेक आव्हानंचा सामना करावा लागत आहे. सरकार समोरील पाच मोठी आव्हाने कोणती हे जाणून घेऊया. 

narendra modi and his government face 5 major problems | एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं

Next

नवी दिल्ली - भारत आणि चीन सैनिकांमध्ये गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. चीनसोबत झालेल्या या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. पॅनगाँग सरोवर, गलवान खोरे, दौलत बेग औल्डी आदी भागांवरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. गलवान खोऱ्यातील पॅट्रोलिंग पॉईंट 14 जवळ सैन्य माघारी सुरू असताना दोन्हीकडील सैनिकांत हा संघर्ष झाला. देशभरात चीनविरोधात संतापाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे देशात कोरोना उद्रेक होत असून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. याच दरम्यान मोदी सरकारला अनेक आव्हानंचा सामना करावा लागत आहे. सरकार समोरील पाच मोठी आव्हाने कोणती हे जाणून घेऊया. 

देशात कोरोनाचा कहर 

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्या उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचे तब्बल 10,974 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे 11903 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 3,54,065 वर पोहोचली आहे. 

India China Face off

चीनसोबत झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या पाच आठवड्यांत पॅनगाँग सरोवर, गलवान खोरे, दौलत बेग औल्डी आदी भागांवरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. चीनने सीमेवरील लष्करी कुमक वाढविल्यानंतर भारतानेही वाढविली. परंतु नंतर लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा होऊन सैन्य माघारीवर सहमती झाली. मात्र दरम्यानच्या काळात सीमेवर आणलेले जास्तीचे 10 हजाराचे सैन्य वादरेषेच्या मागे घेण्यास चीन टाळाटाळ करत असल्यावरून पुन्हापुन्हा वादाचे मुद्दे उपस्थित होत आहेत. 

भारत-नेपाळ संबंधात कटुता

एकीकडे चीन आणि पाकिस्तान भारताच्या सीमेवर कुरापती काढत असतानाच आपला मित्र अडलेल्या नेपाळनेभारताचा काही भाग आपल्या नकाशात समाविष्ट करून टाकला आहे. त्यामुळे दोन देशांत भविष्यात तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. नेपाळने हे पाऊल चीनच्या सांगण्यावरून उचलले की काय, अशीही चर्चा सुरू आहे. भारत-नेपाळ सीमेवरील लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हे भारताचे सामरिकदृष्टया महत्त्वाचे तीन प्रदेश स्वत:च्या हद्दीत दाखविणाऱ्या नेपाळच्या सुधारित राजकीय नकाशास व या भागांचा नेपाळच्या भूप्रदेशात अंतर्भाव करण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात आली. नेपाळी संसदेच्या प्रतिनिधी सभा या कनिष्ठ सभागृहाने या घटनादुरुस्तीला शनिवारी मंजुरी दिली. पंतप्रधान ओ.पी. ओली यांच्या सरकारने यासाठी मांडलेला ठराव 272 सदस्यांच्या सभागृहात जवळजवळ एकमताने मंजूर झाला. 

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती 

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच पाकिस्तानातील भारतीय राजदूतावासात काम करीत असलेले दोन भारतीय कर्मचारी सोमवारी ड्युटीसाठी बाहेर पडल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकच्या भारताच्या दूतावासातील अधिकाऱ्याला सज्जड दम भरून जाब विचारताच या दोन भारतीयांना सोडून देण्यात आले आहे.

2 missing Indian staffers released by Pakistan | दम भरताच पाकिस्तान वठणीवर; दूतावासात काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका

कोरोना लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर आलेलं संकट

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग व्यवहार बंद झाल्याने देशातील स्टार्टअप, लघू आणि मध्यम उद्योग जबरदस्त आर्थिक संकटात सापडले आहेत. कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची झालेली घसरण भरून काढण्याचं मोठं आव्हान मोदी सरकार समोर असणार आहे. देशातील कोरोना विषाणूचा वाढता फैलाव आणि अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी

India China Faceoff: "लहानसहान गोष्टींवर ट्विट करणारे पंतप्रधान शहिदांबद्दल चकार शब्दही काढायला तयार नाहीत"

India China Faceoff : 'मुलाचा अभिमान आहे पण 'या' गोष्टीचं दु:ख'; शहीद कर्नल यांच्या आईने व्यक्त केल्या भावना

CoronaVirus News : कोरोनापासून संरक्षण करणार 'मोदी मास्क'?; लोकांनी दिला असा प्रतिसाद

CoronaVirus News : तुमच्या घरात 'विषारी सॅनिटायझर' तर नाही ना?; CBI ने केलं अलर्ट, वेळीच व्हा सावध

भयंकर! जादुटोण्याच्या संशयातून काकीची हत्या; शिर हातात घेऊन 'तो' 13 किमी चालला अन्...

Web Title: narendra modi and his government face 5 major problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.