नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 11:41 AM2023-03-21T11:41:06+5:302023-03-21T11:41:51+5:30

देशातील लोकशाही संपतेय म्हणून टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती असं त्यांनी म्हटलं. 

Narendra Modi benefits the BJP, not the country; Sanjay Raut's attack on BJP | नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतो, देशाला नाही; संजय राऊतांचा भाजपावर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली - हा देश फक्त भाजपाच्या फायद्यासाठी चालू आहे. सत्ता आणि निवडणुका यापलीकडे भाजपा जात नाही. मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुका का रखडवल्या आहेत? सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे भाजपाचे एकमेव धोरण आहे. त्यासाठी अदानी, मेहूल चौकसी, नीरव मोदी यांना पाठिशी घालायचं. या धोरणाने त्यांचे राज्य चालले असेल तर निवडणूक आणि सत्ता याशिवाय त्यांच्या डोक्यात अन्य काही असेल असं वाटत नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, देशात अनेक प्रकार यापूर्वी कधीच घडले नाहीत. नरेंद्र मोदींचा फायदा भाजपाला होतोय, देशाला नाही. दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक होऊ देत नव्हते. दिल्लीतील सरकार लोकांनी निवडलेले आहे. आज अर्थसंकल्प होऊ दिला जात नाही. देशात अनेक गोष्टी घडतायेत त्या इतिहासात कधी घडल्या नाही. एका उद्योगपतीला वाचवण्यासाठी भाजपा कामाला लागलीय. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना एका फुटीर गटाच्या हाती देण्याचा मोठा सौदा भाजपाने केला. निवडणूक आयोगाचा वापर केला जातो. देशातील लोकशाही संपतेय म्हणून टीका करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांची संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी देशाच्या इतिहासात कधी घडली नव्हती असं त्यांनी म्हटलं. 

चुंबन प्रकरणात SIT अन्...
फोटो ट्विट केला, ज्या मुलीवर कोयत्याने वार झालेत. तिचे पालक माझ्याशी बोलले, जर माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही तर मला इच्छा मरणाची मागणी द्या असा आक्रोश आईने केलाय. बार्शीतल्या काही गुंडांनी तिच्यावर निर्घृण हल्ला केला. जर मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहचवायचा असेल तर मी ते ट्विटरचं माध्यम वापरलं. जर माझ्यावर गुन्हा दाखल होणार असेल तर राज्यातील कायदा कुठल्याप्रकारे चालतोय ते दिसून येते. चुंबन प्रकरणात SIT स्थापन होते आणि मी एका रक्तबंबाळ मुलीचा फोटो टाकून तिला न्याय मागितला म्हणून माझ्यावर गुन्हा नोंदवला जातो याचा अर्थ राज्यातील कायदा सुव्यवस्था काही लोकांच्या कोठीवर कशी नाचतेय हे स्पष्ट होते अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली. 

ज्यांनी तक्रार केली तेच न्यायाधीशांच्या भूमिकेत
विधानसभेच्या हक्कभंग समितीत ज्यांनी माझ्याविरोधात तक्रार केली तेच न्यायाच्या भूमिकेत आहेत. ज्यांच्याविरोधात मी ५०० कोटी मनी लॉन्ड्रिंगचा जे आरोप, पुरावे दिले ते हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. हे सगळे ठरवून झालेय त्यामुळे इथं न्याय म्हणण्याची शक्यता कमी आहे. मी संपूर्ण विधिमंडळाला चोरमंडळ म्हटलं नाही. जे शिवसेनेतून फुटून गेले. त्यांच्याविरोधात माझे विधान आहे. हे चोरमंडळ विधिमंडळ असू शकत नाही असं मी म्हटलं आहे असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. राहुल कूल, दादा भूसे यांच्याविरोधात मी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे दिले आहेत. परंतु त्यांच्याकडे ढुंकणही पाहिले जात नाही. मात्र विरोधकांना जाणीवपूर्वक गोवण्याचं काम केले जाते असा आरोप राऊतांनी केला. 

उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा 
२६ मार्चला मालेगावात उद्धव ठाकरेंची सभा होतेय, या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. ही सभा ऐतिहासिक होईल. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी या सभेची आखणी करत आहेत अशी माहिती संजय राऊतांनी दिली.  
 

Web Title: Narendra Modi benefits the BJP, not the country; Sanjay Raut's attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.