Narendra Modi:मोठी घोषणा ! देशात 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देणार मोदी सरकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 10:21 AM2022-06-14T10:21:19+5:302022-06-14T10:23:57+5:30
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे
नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदींनी सर्वच मंत्रालयांना पुढील दीड वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्याचे बजावले आहे. पीएमओ कार्यालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्वच मानव संसाधनच्या सद्यस्थितीचा आढावा घेत समिक्षा केली. त्यानंतर, केंद्र सरकारअंतर्गत असलेल्या मंत्रालयीन सर्वच विभागांना नोकरी देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लक्षावधी बेरोजगार युवकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारतर्फे पुढील 1.5 वर्षात 10 लाख नोकऱ्या देण्यात येतील. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदींनी यापूर्वी एप्रिल महिन्यातही संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी, नोकरी देण्यासंदर्भात चर्चा केली होती. तसेच, सरकारमधील रिक्त जागांवर लवकरात लवकर पदांची भरती करावी, असे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यातून, देशातील युवकांना नोकरीची चांगली संधी मिळेल.
दरम्यान, कोरोनामुळे देशातील अनेक युवकांचा रोजगार गेला आहे. त्यातच, वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून लोकांकडून केंद्र सरकारवर टिका करण्यात येत आहे. त्यात, मोदी सरकारने केलेली 10 लाख नोकऱ्यांची घोषणा युवक वर्गाला दिलासा देणारी आहे.