Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आपणही करूशकता विश; करावं लागेल फक्त एवढं काम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 09:11 AM2022-09-17T09:11:51+5:302022-09-17T09:13:05+5:30

How To Wish PM Modi On His Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज 72 वर्षांचे झाले आहेत. या आनंदाच्या क्षणी त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जर आपलीही इच्छा असेल, तर आपणही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

Narendra Modi Birthday 2022 know about how to wish pm Narendra Modi on his birthday | Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आपणही करूशकता विश; करावं लागेल फक्त एवढं काम

Narendra Modi Birthday 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त आपणही करूशकता विश; करावं लागेल फक्त एवढं काम

googlenewsNext

पंतप्रधाननरेंद्र मोदी आज 72 वर्षांचे झाले आहेत. या आनंदाच्या क्षणी त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, अनेक भेटवस्तूही येत आहेत. जर आपलीही इच्छा असेल, तर आपणही पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आपल्याला एक छोटेसे काम करावे लागेल. तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कशाप्रकारे विश करू शकतो अथवा शुभेच्छा देऊ शकतो जाणून घेऊयात...

अशा पद्धतीने करता येईल विश - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विश करण्यासाठी सर्वात सोपे माध्यम म्हणजे NaMo अ‍ॅप. या अ‍ॅपच्या माध्यमाने आपण त्यांना मेसेज, व्हिडिओ अथवा फोटो पाठवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. याशिवाय आपण Gift of Seva या माध्यमानेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना विश करू शकता.

NaMo अ‍ॅपच्या माध्यमाने कसे कराल विश? - 
नमो अ‍ॅपच्या माध्यमाने आपण आपला व्हिडिओ रेकॉर्ड करून पंतप्रधान मोदींना विश करू शकता. तसेच, आपल्याला त्यांना फोटो पाठवून शुभेच्छा देण्याची इच्छा असेल, तर आपण तो फोटो अ‍ॅपवर अपलोड करकरून त्यांना शुभेच्छा देऊ शकता. 

कुटुंबासह विश करा - 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, संपूर्ण कुटुंबासह शुभेच्छा देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. यासाठी आपण e-card बनवून, त्यात आपल्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश करू शकता. तसेच त्याखाली एखादा मेसेजही लिहू शकता. यानंतर आपण हे e-card अपलोड करून मोदींना शुभेच्छा देऊ शकता. महत्वाचे म्हणजे आपण एकापेक्षा अधिक e-card देखील पाठवू शकता.

या पद्धतीनेही देता येतील शुभेच्छा... - 
PM नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणखी एका अनोख्या पद्धतीने विश करता येऊ शकते. ‘Gift of Seva’ या नव्या फीचरच्या माध्यमाने युजर्स कुठल्याही भागात जाऊन संकल्प करू शकतात. ते Blood Donation, Leading Digital, TB Mukt Bharat, Swachh Bharat, Vocal for Local to Become Atma Nirbhar, Ek Bharat, LiFE: Pro-Planet People, India Shreshtha Bharat and Catch the Rain यांपैकी कुठल्याही पद्धतीचा संकल्प करू शकतात. 

NaMo अ‍ॅपच्या माध्यमाने सर्व प्रकारचे संकल्प अथवा प्लेज रेकॉर्ड केले जातील. एवढेच नाही, तर आपण या अ‍ॅपवर 5 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढाओ आणि किसान सेवा आदींसाठी डोनेट करू शकता.

Web Title: Narendra Modi Birthday 2022 know about how to wish pm Narendra Modi on his birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.