Modi Cabinet Reshuffle : राणे, शिंदेंपासून वरुण गांधींपर्यंत; मोदींच्या मंत्रिमंडळात 'हे' 27 नेते होऊ शकतात सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:00 PM2021-06-26T19:00:19+5:302021-06-26T19:04:48+5:30
मास्टर लिस्टमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार नारायण रणेंसह महाराष्ट्रातील आणखी एका खासदाराचा समावेश...
नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आणि फेरबदलाच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. राज्यसभा खासदार नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे, सुशील मोदी, सर्बानंद सोनोवाल आणि भूपेंद्र यादव यांच्यासह 27 संभाव्य नेते मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि फेरबदलात सामील होऊ शकतात. महत्वाचे म्हणजे, 2019मध्ये पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यानंतर, हा मंत्रिमंडळाचा अशा प्रकारचा पहिलाच फेरबदलासह विस्तार असेल.
नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ज्या नव्या मंत्र्यांची शपथ घेण्याची शक्यता आहे त्यांत मध्य प्रदेशचे माजी काँग्रेस नेते तथा आताचे भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी, राजस्थानातील भूपेंद्र यादव आणि मध्य प्रदेशातून कैलाश विजयवर्गीय यांचा समावेश आहे. कैलाश विजयवर्गीय हे पश्चिम बंगालमध्ये भाजप अभियानचे प्रभारी होते. भाजपचे प्रवक्ता आणि अल्पसंख्यक चेहरा सैयद जफर इस्लाम यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते.
मास्टर लिस्टमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार नारायण रणे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप यूपी प्रमुख स्वतंत्र देव सिंह, पंकज चौधरी, वरुण गांधी आणि मित्र पक्षाच्या अनुप्रिया पटेल यांचाही संभाव्य नेत्यांमध्ये समावेश आहे.
Coronavirus: मोदी सरकारची मोठी घोषणा; कोरोना उपचारावरील खर्चाला आयकरात मिळणार सूट
राज्यसभा खासदार अनिल जैन, ओडिशातील खासदार अश्विनी वैष्णव आणि बैजयंत पांडा, पश्चिम बंगालचे माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी, जैन अखिल भारतीय टेनिस संघाचे अध्यक्षही आहेत. राजस्थानमधून मोदी सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री पी.पी. चौधरी, चूरू येथील युवा खासदार राहुल कस्वां आणि सीकरचे खासदार सुमेधानंद सरस्वती यांचाही या यादीत समावेश आहे. तर दिल्लीतून एकमेव नेत्या नई दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी याही मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात.
बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या विरोधात बंड करणारे पशुपती पारस यांना लोजपाकडून केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळण्याची शक्यता आहे. या प्रकारे जेडीयूचे आर.सी.पी. सिंह आणि संतोष कुमार हेही या यादीत आहेत. कर्नाटकचे प्रतिनिधीत्व राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर करू शकतात. गुजरात भाजप अध्यक्ष सी.आर. पाटिल आणि अहमदाबाद पश्चिमचे खासदार किरीट सोलंकी यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. हरियाणातून सिरसाच्या खासदार सुनीता दुग्गल, एक माजी आयकर अधिकारीदेखील संभाव्य यादीत सामील आहेत. याशिवाय आपल्या भाषणाने संसदेत छाप टाकणारे लडाखचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांच्या संदर्भातही विचार होऊ शकतो.
खरे तर, रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी सारख्या नेत्यांचे अकाली नधन आणि शिवसेना तसेच अकाली दल एनडीएतून बाहेर पडल्याने काही जागा रिक्त झाल्याने हा फेरबदलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या निवडणुका, हेही फेरबदलाचे एक कारण आहे.