Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 10:29 PM2021-07-08T22:29:09+5:302021-07-08T22:29:49+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle: १२ मंत्र्यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित विस्तार विस्तार काल पार पडला. त्यानंतर खातेवाटपही जाहीर झालं. मात्र राष्ट्रपती भवनात ४३ खासदारांचा शपथविधी होण्याआधी १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. रवीशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या दिग्गजांना हटवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. कामगिरी चांगली नसल्यानं १२ जणांना नारळ देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर आज पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं.
बारा मंत्र्यांचे राजीनामे का घेण्यात आले यावर मोदींनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाष्य केलं. 'व्यवस्थेमुळे मंत्र्यांना हटवण्यात आलं. त्यामागे क्षमता हे कारण नाही. मंत्र्यांच्या राजीनाम्यांचा त्यांचा कार्यक्षमतेशी संबंध नाही. जुन्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे,' असं मोदी म्हणाले. 'तुम्ही ज्यांच्याकडून पदभार स्वीकारलात, त्यांच्या अनुभवाचा फायदा घ्या. माध्यमांना उगाच प्रतिक्रिया देणं, विधान करणं टाळा,' असे सल्ले मोदींनी नवनियुक्त मंत्र्यांना दिले.
या १२ जणांना नारळ-
१. रविशंकर प्रसाद
२. प्रकाश जावडेकर
३. थावर चंद गेहलोत
४. रमेश पोखरियाल निशंक
५. डॉ. हर्षवर्धन
६. सदानंद गौडा
७. संतोष कुमार गंगवार
८. बाबुल सुप्रियो
९. संजय धोत्रे
१०. रत्तन लाल कटारिया
११. प्रताप चंद सारंगी
१२. देबोश्री चौधरी