मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 04:25 AM2017-09-20T04:25:47+5:302017-09-20T04:25:57+5:30

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Narendra Modi compares Patel, Ambedkar with criticism of Congress; Investments, exports dropped, how to make progress? | मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी?

मोदींची तुलना पटेल, आंबेडकरांशी, काँग्रेसची शहांवर टीका; गुंतवणूक, निर्यात घसरली, तरीही प्रगती कशी?

Next

शीलेश शर्मा 
नवी दिल्ली : भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्यानंतर, त्याचे तीव्र प्रतिसाद उमटू लागले आहेत. काँग्रेसने अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सरकारने आर्थिक मुद्द्यावर तत्काळ सर्वपक्षीय विश्वास संपादन करावा. परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी या पक्षांशी चर्चा करावी, अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
सरदार पटेल हे भौगोलिक परिवर्तनाचे जनक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाचे, तर मोदी आर्थिक परिवर्तनाचे जनक आहेत, असे शहा यांनी रविवारी म्हटले होते. काँग्रेसचे प्रवक्ते खा. अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. विकास दर ५.७ टक्क्यांवर गेला आहे. मोदी सरकारने या गणनेची पद्धत बदलल्याने ही आकडेवारी दिसत आहे. जुन्या पद्धतीने आकडेवारी तपासली असती, तर विकास दर ३ ते ४ टक्क्यांच्या आसपास असता.
शहा यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, खोटे बोलून व्यवस्था चालू शकत नाही. इतिहास साक्षीदार आहे की, ७० वर्षांत देशाची आर्थिक परिस्थिती एवढी वाईट कधी नव्हती आणि शहा खोटी स्तुती करून मोदींना आर्थिक परिवर्तनाचे जनक म्हणत आहेत. देशात रोजगाराचा यक्ष प्रश्न आहे. सरकारी आकडे सांगतात की, रोजगाराची परिस्थिती गत ८ वर्षांतील सर्वात किमान स्तरावर आहे.
सीएमआयचा डेटा सांगतो की, १५ लाख लोकांच्या नोकºया गेल्या. निवडणुकीत काय शब्द दिला होता व प्रत्यक्षात काय होत आहे? शेतकºयांना किमान आधारभूत किमतीसोबत ५० टक्के बोनसचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असे सवाल करून अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, सरकारने आता ते देणे शक्य नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्राद्वारे सांगितले आहे.
>स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रकार
गुंतवणूक २७ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, निर्यात घसरली आहे. छोट्या उद्योगातील विकासात १६ टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही अमित शहा यांना वाटते की, देशाची प्रगती होत आहे. एनपीएत १४ टक्क्यांची वाढ झाली आहे, पण सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Narendra Modi compares Patel, Ambedkar with criticism of Congress; Investments, exports dropped, how to make progress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.