Narendra Modi: कोरोना निर्बंध उठताच रोजगार दुप्पटीने वाढला, वर्षात 1 कोटी 20 लाख नवे जॉब्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:20 PM2022-02-08T12:20:45+5:302022-02-08T12:30:03+5:30

ईपीएफओवरुन देशातील रोजगार निर्मित्तीची एकदम योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळते. त्यानुसार देशात 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 20 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.

Narendra Modi: Employment doubled as Corona restrictions were lifted, creating 12 million new jobs a year | Narendra Modi: कोरोना निर्बंध उठताच रोजगार दुप्पटीने वाढला, वर्षात 1 कोटी 20 लाख नवे जॉब्स

Narendra Modi: कोरोना निर्बंध उठताच रोजगार दुप्पटीने वाढला, वर्षात 1 कोटी 20 लाख नवे जॉब्स

googlenewsNext

नवी दिल्ली  - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना देशातील कोरोना परिस्थितीवर केंद्र सरकारने केलेल्या कार्याची माहिती दिली. लोकसभेत बोलताना मोदींनी केंद्र सरकारने गरिब कल्याण योजनेंतर्गत देशातील गरीबांना मोफत धान्यवाटप केल्याचं सांगितलं. कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी ठरलो, त्यानंतर आता रोजगारनिर्मित्तही वाढ झाल्याचे मोदींनी सांगितले. राज्यसभेत बोलताना मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ईपीएफओवरुन देशातील रोजगार निर्मित्तीची एकदम योग्य आणि विश्वासार्ह माहिती मिळते. त्यानुसार देशात 2021 मध्ये जवळपास 1 कोटी 20 लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत. हे सर्व फॉर्मल जॉब्स आहेत, इनफॉर्मल नाहीत. त्यामध्ये 60 ते 65 लाख नोकरदार हे 18 ते 25 वर्षे वयाची तरुणपिढी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना सांगितले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींनी कोविड आणि कोविडनंतरच्या देशातील स्थितीचं वर्णन केलं. तसेच, कोरोनानंतर रोजगारनिर्मित्तीत वाढ झाल्याचंही सांगितलं.  

नेसकॉमच्या अहवालानुसार कोरोनाच्या पहिल्या तुलनेत कोविड निर्बंध उठवल्यानंतर दुप्पटीनं नोकर भरती होत आहे. नेसकॉमच्या डेटानुसार 2017 नंतर गेल्या वर्षभरात 27 लाख जॉब्स आयटी सेक्टरमध्ये उपलब्ध झाले आहेत. आयटी सेक्टरमध्ये काम करणारे हा वरिष्ठ स्तरावरील वर्ग असतो. म्हणजे, देशातून ग्लोबल एक्सपोर्ट वाढला असून रोजगार निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले. एमएसएमई सेक्टरच्या माध्यमातून उत्पादन क्षेत्रात वाढ झाली असून नवीन रोजगार निर्मित्ती झाली आहे. सन 2021 मध्ये केवळ एका वर्षात भारताने जेवढे युनिकॉर्न बनवले आहेत, ते देशाच्या इतिहासातील सर्वात जास्त आहेत. जर हे रोजगारनिर्मित्तीत येत नसेल, तर रोजगारापेक्षा राजकारणाची सर्वाधिक तुलना होईल, असेही मोदींनी राज्यसभेत बोलताना म्हटले.

मोबाईल उत्पादनात भारताचा पहिला नंबर  

मोबाईल उत्पादनात भारत आता जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ऑटोमोबाईल, बॅटरी निर्मितीत आपला समावेश अग्रगण्य देशांच्या यादीत होतो. इंजिनीयरिंग उत्पादनांची निर्यात वाढली आहे. हे आपल्या देशाचं कौशल्य आहे. संकटाला आपण धीरानं सामोरे गेलो. त्याचं श्रेय देशवासीयांना जातं. आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेलं काम तर अतिशय कौतुकास्पद आहे. मी त्यांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं.

80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं

कोरोना काळात कोणकोणती कामं झाली त्याची यादी मोठी आहे. लॉकडाऊन काळात कोणी उपाशी राहू नये यासाठी ८० कोटी लोकांना मोफत रेशन दिलं. लाखो लोकांना घरं दिली. घरासाठी येणारा खर्च पाहता आता या व्यक्ती लखपती झाल्या असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. ५ कोटी ग्रामीण कुटुंबाना नळातून पाणी पुरवलं. कोरोना काळात ग्रामीण भागाला लॉकडाऊनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम दिसला. शेतकऱ्यांनी बंपर उत्पादन घेतलं आणि अर्थव्यवस्थेला हात दिला, असं म्हणत मोदींनी शेतकऱ्यांचे आभार मान

Web Title: Narendra Modi: Employment doubled as Corona restrictions were lifted, creating 12 million new jobs a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.