सफाई कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदींनी दिले बचतीतील २१ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 05:56 AM2019-03-07T05:56:42+5:302019-03-07T05:56:48+5:30

कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या निधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक बचतीतून जमा केलेले २१ लाख रुपये देऊ केले आहेत.

Narendra Modi gave 21 lakhs of savings to clean workers | सफाई कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदींनी दिले बचतीतील २१ लाख

सफाई कर्मचाऱ्यांसाठी नरेंद्र मोदींनी दिले बचतीतील २१ लाख

Next

नवी दिल्ली : कुंभमेळ्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या निधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक बचतीतून जमा केलेले २१ लाख रुपये देऊ केले आहेत. ही माहिती पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळ््यात प्रयागराज येथे काही सफाई कर्मचाऱ्यांची पाद्यपूजा केली होती. हे कर्मचारी खरे कर्मयोगी असल्याचेही ते म्हणाले होते. कुंभमेळा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्री, अधिकारी तसेच सफाई कर्मचाºयांचेही आभार मानले होते. मात्र मोदींनी केलेली पाद्यपूजा हे एक निव्वळ नाटक असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली होती.

Web Title: Narendra Modi gave 21 lakhs of savings to clean workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.