नोटाबंदीच्या टीकाकारांना मोदींनी दिले 'हे' उत्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 02:49 PM2019-01-30T14:49:01+5:302019-01-30T14:49:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्ताने गुजरातमधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह मेमोरियलचे भूमीपूजन करणार आहेत.
सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंधरवड्यात दुसऱ्यांदा गुजरातच्या दौऱ्यावर असून विरोधकांकडून होणाऱ्या नोटाबंदीवरील टीकांवर उत्तर दिले आहे. काही जण विचारत आहेत, नोटाबंदींने काय फायदा झाला? त्यांनी तरुणांना जाऊन विचारावे ज्यांना नोटाबंदीनंतर कमी झालेली घरे घेता आली. त्या गरीब, मध्यम वर्गातील लोकांना विचारायला हवे ज्यांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्ताने गुजरातमधील राष्ट्रीय मीठ सत्याग्रह मेमोरियलचे भूमीपूजन करणार आहेत. तसेच सुरतच्या विमानतळाच्या विस्ताराचेही भूमीपूजन करतील. यानंतर ते सभेला संबोधित करणार आहेत.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मीठाचा सत्याग्रह करत दांडी यात्रा काढली होती. यावेळी त्यांनी 80 सत्याग्रहींना सोबत घेत साबरमती आश्रमाहून अहमदाबादच्या समुद्रकिनाऱ्य़ावरील दांडी या गावी पायी जात सविनय कायदेभंग करत इंग्रजांच्या मीठावरील कायद्याला आव्हान दिले होते.