मोदी सरकारनं लॉन्च केली 'भूमी बँक', आता गुंतवणूकदारांना घरबसल्या मिळणार 'हे' मोठे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 04:19 PM2020-08-28T16:19:01+5:302020-08-28T16:27:45+5:30
भूमि बँक सिस्टिमला आतापर्यंत केवळ सहा राज्येच जोडली गेली आहेत. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या सिस्टिमशी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश जोडले जातील, अशी सरकारला आशा आहे.
नवी दिल्ला - केंद्रातील मोदी सरकारने आता एका विशेष बँकेची सुरुवात केली आहे. यामुळे उद्योगाच्या दृष्टीने विविध राज्यांतील जमिनीची उपलब्धता आणि तिच्याशी संबंधित इतर माहितीही डिजिटल माध्यमाने सहजपणे मिळू शकणार आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टिमने (जीआयएस) सुसज्ज राष्ट्रीय 'भूमी बँकेची' सुरुवात करताना केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले, की याच्या माध्यमाने गुंतवणूकदार उद्योगासाठीची जमीन आणि संसाधनांच्या उपलब्धतेची माहिती मिळवू शकतील.
भूमि बँक सिस्टिमला आतापर्यंत केवळ सहा राज्येच जोडली गेली आहेत. मात्र, डिसेंबर 2020 पर्यंत या सिस्टिमशी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश जोडले जातील, अशी सरकारला आशा आहे. ही बँक सध्या सुरुवातीच्याच टप्प्यावर आहे. यानंतर जमिनीची ओळख आणि खरेदी प्रक्रिया अधिक सक्षम आणि पारदर्शक बनवली जाईल. यासाठी राज्यांनाही आपल्या भागातील जमिनीसंदर्भात माहिती द्यावी लागेल.
वाणिज्य तथा उद्योग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘‘या प्रणालीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 3,300 पेक्षा अधिक औद्योगिक पार्कचा समावेश करण्यात आला आहे. यात तब्बल 4,75,000 हेक्टर जमिनीचा समावेश होतो. मिळालेल्या माहितीनुसार, यात वने, सिंचन क्षेत्र, कच्च्या मालाचा हीट मॅप, तसेच संपर्काच्या विविध पायऱ्यांचा समावेश आहे.’’
पीयूष गोयल म्हणाले, ज्या देशांत भारतीय कंपन्यांना बंधनांचा सामना करावा लागतो, त्यांच्यासाठी काही म्युच्यूअल गोष्टीही लागू केल्या जाऊ शकतात. या शिवाय, देशात व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी संबंधित सर्व आवश्यक परवानग्या घेण्यासाठी त्यांनी सिंगल विंडो प्रणाली तयार करण्यावरही जोर दिला. तसेच, ‘‘यामुळे गुंतवणूकदारांना माहिती मिळवणे आणि विविध ठिकानांवरून मंजुरी घेण्यासाठी अनेक प्लॅटफार्म अथवा कार्यालयांत जाण्याची आवश्यकतादेखील जवळपास संपुष्टात येईल. या प्रणालीच्या माध्यमाने गुंतवणूकदारांना वेळच्या वेळी माहिती मुळू शकते,’’ असेही गोयल म्हणाले,
ही बँकिंग प्रणाली औद्योगिक माहिती प्रणाली (आयआयएस) आणि राज्यांची भौगोलिक सूचना प्रणालीचे (जीआयएस) एकत्रीकरण करून तयार करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार
कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा
मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण
आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन
खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण
CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्ट नसल्याचा दावा