मंदिरांवरील हल्ले आणि वाढता शीख कट्टरतावाद; कॅनाडा-ब्रिटेन मोदी सरकारच्या रडावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 02:01 PM2022-09-21T14:01:11+5:302022-09-21T14:02:43+5:30

ब्रिटन आणि कॅनडामध्ये शीख कट्टरतावाद आणि हिंदू मंदिरांवरील हल्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर आता मोदी सरकार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे.

Narendra Modi government monitoring on Hindu temple attacks and Sikh radicalization in Britain-Canada | मंदिरांवरील हल्ले आणि वाढता शीख कट्टरतावाद; कॅनाडा-ब्रिटेन मोदी सरकारच्या रडावर

मंदिरांवरील हल्ले आणि वाढता शीख कट्टरतावाद; कॅनाडा-ब्रिटेन मोदी सरकारच्या रडावर

googlenewsNext

ब्रिटन आणि कॅनडाच्या काही भागांमध्ये शीख कट्टरतावाद आणि हिंदू मंदिरांवरील हल्याच्या घटना वाढल्या आहेत. इंग्लंडमध्येही लीसेस्टरनंतर स्मेथविकमध्येही अशाच प्रकारची घटना घडली. दावा करण्यात येतोय की, मंगळवारी शीख कट्टरतावादी मोठ्या संख्येने मंदिराबाहेर जमले आणि घोषणाबाजी करत निदर्शने केली. आता या सर्व घटनांकडे मोदी सरकार गांभीर्याने पाहत असून, ब्रिटन आणि कॅनडावर सरकारचे बारीक लक्ष आहे.

सरकारचे बारकाईने लक्ष
या घटनांवरुन कॅनडा आणि ब्रिटनला उत्तर देण्यासाठी मोदी सरकार विविध पर्यायांचा विचार करत आहे. लेस्टरमध्ये भारतीय समुदायाच्या विरोधात झालेल्या निदर्शनाबाबत भारत सरकारने ब्रिटीश सरकारला विरोध व्यक्त केला आहे. तसेच, शीख कट्टरतावाद्यांकडून फुटीरतावादाच्या उद्देशाने उभारल्या जाणाऱ्या निधीकडे ब्रिटिश एजन्सी कशाप्रकारे डोळेझाक करत आहेत, यावरही भारताचे लक्ष आहे.

मोदी सरकार गप्प बसणार नाही
मोदी सरकारने अशा घटनांवर गप्प न बसण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांतील भारतविरोधी कारवायांना सरकार प्रत्युत्तर देईल. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेतल्याची माहिती मिळत आहे. तसेच भारताचे प्रत्युत्तरही त्यानुसारच असेल असे बोलले जात आहे.

शिख फॉर जस्टिसने सार्वमत घेतले होते
यापूर्वी कॅनडातील टोरंटो येथील स्वामीनारायण मंदिराच्या भिंतींवर काही कट्टरतावाद्यांकडून विविध घोषणा लिहिण्याची आणि भित्तिचित्रे बनवल्याची घटना समोर आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भारतीयांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली. कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही या घटनेचा निषेध केला आहे. कॅनडातील ब्रॅम्प्टन येथे 19 सप्टेंबर रोजी शिख फॉर जस्टिसच्या वतीने कथितपणे सार्वमत घेण्यात आले. पण, पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आणि त्यांच्या सरकारने याकडे डोळेझाक केली.

Web Title: Narendra Modi government monitoring on Hindu temple attacks and Sikh radicalization in Britain-Canada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.