मोदी सरकार दिवाळीला देणार बंपर गिफ्ट; शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; भाडेकरूंनाही लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 08:04 AM2023-10-12T08:04:26+5:302023-10-12T08:05:15+5:30

शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे.

Narendra modi government to give Diwali bumper gift; Farmers honor fund will be doubled; Tenants also benefit | मोदी सरकार दिवाळीला देणार बंपर गिफ्ट; शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; भाडेकरूंनाही लाभ

मोदी सरकार दिवाळीला देणार बंपर गिफ्ट; शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; भाडेकरूंनाही लाभ

संजय शर्मा -

नवी दिल्ली :  २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी दिवाळीत देशाच्या जनतेला बंपर गिफ्ट देण्याची मोदी सरकार तयारी करीत आहे. भाडेकरूंना घर खरेदी करण्यासाठी आवास निधी योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करणे व केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून ते बोनस देण्याच्या सर्व घोषणा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविण्यापासून शेतकरी सन्मान निधीची रक्कम दुप्पट करण्याचे प्रस्ताव विचाराधीन होते; परंतु, हे सर्व प्रस्ताव दिवाळीनिमित्त भेट देण्यासाठी तूर्त रोखण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत ३ खनिजांच्या रॉयल्टी दराला मंजुरी देण्याचा  निर्णय घेण्यात आला.

निवडणुकीचा मुहूर्त -
१२ नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. १७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश व छत्तीसगढ, २५ नोव्हेंबर रोजी राजस्थान आणि ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये मतदान होणार आहे. निवडणुकीच्या तारखा व दिवाळीच्या तारखा पाहून दिवाळीच्या मुहूर्तावर देशातील जनतेला बंपर गिफ्ट देण्याची तयारी सुरू आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या ४२ टक्क्यांवरून तो ४५ टक्के होण्याचा अंदाज आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलै २०२३ पासून होईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढविणार -
- शेतकरी सन्मान निधीची रक्कम सहा हजारांपासून वाढवून १२ हजार करण्याची योजना आहे.
- केंद्रीय कर्मचारी व पेन्शनर्ससाठी डीए, बोनस देण्याची घोषणा होणार आहे.
- देशातील १० कोटींपेक्षा जास्त भाडेकरूंसाठी आवास निधी योजना सुरू केली जाणार आहे.
- महिलांसाठीही आकर्षक योजना सुरू करण्यात येणार आहे.
 

Web Title: Narendra modi government to give Diwali bumper gift; Farmers honor fund will be doubled; Tenants also benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.