PM नरेंद्र मोदींसमोर मुस्लिमांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा..! Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:07 PM2022-08-28T16:07:55+5:302022-08-28T16:08:52+5:30
आज गुजरातच्या भुजमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता, याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरातमध्ये आले आहेत. यादरम्यान पंतप्रधानांनी आज भुजमध्ये तीन किमीचा भव्य रोड शो केला. यावेळी स्थानिक लोकांनी पंतप्रधानांचे जोरदार स्वागत केले. संपूर्ण रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या सन्मानार्थ पारंपारिक नृत्याचे आयोजन करण्यात आले होते, तर नरेंद्र मोदी झिंदाबाद आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जात होत्या. टीव्ही9 हिंदीने याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
पीएम के रोड शो के दौरान मुस्लिम समुदाय के लोगों द्वारा भारत माता की जय के नारे लगाए... #modirally#gujarat#pmmodi#narendramodipic.twitter.com/NRCidiRd9p
— अजीत तिवारी (@ajittiwari24) August 28, 2022
या रोड शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मुस्लिम समाजातील लोक मोठ्या संख्येने भारत माता की जयच्या घोषणा देत आहेत. त्याचवेळी पंतप्रधानही गाडीतून उतरून लोकांचे अभिवादन स्वीकारत आहेत. गुजरातमधील भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली म्हणून बांधण्यात आलेल्या स्मृती व्हॅन या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान रविवारी आले होते. या कार्यक्रमापूर्वी तीन किमीचा रोड शो आयोजित करण्यात आला होता.
#WATCH | Smritivan earthquake memorial and museum inaugurated by PM Narendra Modi in Bhuj, Gujarat; CM Bhupendra Patel also present pic.twitter.com/v7EnnkSlam— ANI (@ANI) August 28, 2022
मुख्यमंत्री असताना योजना बनवली होती
विशेष म्हणजे 26 जानेवारी 2001 रोजी गुजरातमध्ये झालेल्या भूकंपात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात सुमारे 13000 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतो. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना स्मृती वन संग्रहालय उभारण्याची योजना तयार केली होती. भुजियो टेकडीवर सुमारे 470 एकर जागेवर बांधलेल्या या संग्रहालयात आठ ब्लॉक्स बनवण्यात आले आहेत. यामध्ये भूकंपात प्राण गमावलेल्या 12,932 बळींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. याशिवाय गुजरातची हडप्पा संस्कृती, भूकंपशास्त्र, वारसा, संस्कृती आणि कला यांची झलकही येथे पाहायला मिळेल.