Narendra Modi: गुरू-शिष्याची भेट... PM मोदींनी हात जोडून शाळेतील गुरुजींना केलं वंदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:15 IST2022-06-10T18:13:13+5:302022-06-10T18:15:42+5:30
मोदींचा हा फोटो नवसारी येथील असल्याचं समजतंय. जेथे मोदींनी आपल्या शाळेच्या शिक्षकांची भेट घेतली.

Narendra Modi: गुरू-शिष्याची भेट... PM मोदींनी हात जोडून शाळेतील गुरुजींना केलं वंदन
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या गावी म्हणजेच गुजरातला गेल्यानंतर नेहमीच आपल्या आईंची भेट घेतात. आईसोबत वेळ घालवतात, गप्पा मारतात, जेवण करतात. त्यातून, मोदींचे मातृप्रेम दिसून येते. आता, आईनंतरचा पहिला गुरू असलेल्या आपल्या शाळेतील शिक्षकाचीनरेंद्र मोदींनी तितक्याच आपुलकीने भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मोदींचा हा फोटो नवसारी येथील असल्याचं समजतंय. जेथे मोदींनी आपल्या शाळेच्या शिक्षकांची भेट घेतली. जगदीश नाईक असं त्यांच्या शिक्षकांचं नाव असून मोदींनी दोन्ही हात जोडून गुरुजींना वंदन केल्याचं फोटोत दिसून येत आहे. तर, नाईक गुरुजी मोदींच्या डोक्यावर हात ठेऊन त्यांना आशीर्वाद देताना दिसून येतात. गुरु-शिष्याच्या या प्रेमळ, आदरयुक्त भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्या शाळेत शिकलेला मुलगा देशाचा पंतप्रधान झाला, आणि तो भेटायला आला, यापेक्षा दुसरा मोठा आनंद गुरुजींना, त्या शाळेला काय असू शकतो.