...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 03:18 PM2024-09-16T15:18:50+5:302024-09-16T15:19:09+5:30

Narendra Modi : गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत आणि पुढील 1000 वर्षांच्या योजनेवर चर्चा केली.

Narendra Modi in Gandhinagar: Prime Minister Modi plans for the next 1,000 years | ...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात भाजपचा प्रत्येक खासदार केलेल्या कामाची माहिती देशातील जनतेला देत आहे. गुजरातमधील गांधी नगर येथे आयोजित 'ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीटिंग अँड एक्झिबिशन'च्या चौथ्या आवृत्तीत देशाच्या पंतप्रधानांनी 100 दिवसांच्या कामांबाबत, तसेच पुढील 1000 वर्षांच्या योजनेवरही चर्चा केली. 

100 दिवस कुठे फोकस होता
गांधीनगरमध्ये ‘ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स मीट अँड एक्झिबिशन’ (री-इन्व्हेस्ट 2024) च्या चौथ्या आवृत्तीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसांत सरकारने देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ देशवासियांनाच नाही, तर संपूर्ण जगाला असे वाटते की, 21 व्या शतकासाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण आहे. सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांमध्ये तुम्ही आमचे प्राधान्यक्रम, गती आणि प्रमाण पाहू शकता. आम्ही देशाच्या वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक क्षेत्राकडे आणि घटकांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे. 

पुढील 1,000 वर्षांचा पाया तयार केला जातोय
मोदी पुढे म्हणाले की, भारत पुढील 1000 वर्षांच्या विकासाचा पाया घालत आहे आणि केवळ शीर्षस्थानी पोहोचण्यावर नाही, तर ते स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्यासाठी हरित भविष्य आणि शून्य उत्सर्जन हे केवळ शब्द नाहीत, तर या देशाच्या गरजा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सरकार अयोध्या आणि इतर 16 शहरांना मॉडेल 'सोलर सिटी' म्हणून विकसित करण्यासाठी काम करत आहे. 140 कोटी भारतीयांनी देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचा संकल्प केला आहे.

हरित ऊर्जेवर 12 हजार कोटी
सरकारने या 100 दिवसांमध्ये हरित आणि अक्षय ऊर्जेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. देश 31 हजार मेगावॅट जलविद्युत निर्मितीवर वेगाने काम करत आहे. या प्रकल्पासाठी सरकारने 12 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. देशात अक्षय ऊर्जेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण देशात हरित ऊर्जेचा पुरवठा करता यावा, यासाठी सरकार याबाबत धोरण तयार करत आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले. 

Web Title: Narendra Modi in Gandhinagar: Prime Minister Modi plans for the next 1,000 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.