इच्छा + स्थिरता = संकल्प, संकल्प + परिश्रम = सिद्धी, पीएमओतील कर्मचाऱ्यांना मोदींचा कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 06:53 AM2024-06-11T06:53:35+5:302024-06-11T06:53:57+5:30
Narendra Modi In PMO: इच्छा स्थिरता = संकल्प, संकल्प परिश्रम = सिद्धी असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, देशातील व्यवस्थेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी व कामे पार पाडण्याची गती वाढविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नवी दिल्ली - इच्छा स्थिरता = संकल्प, संकल्प परिश्रम = सिद्धी असा कानमंत्र पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, देशातील व्यवस्थेमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करण्यासाठी व कामे पार पाडण्याची गती वाढविण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, दहा वर्षांपूर्वी पंतप्रधान कार्यालय हे एक सत्ताकेंद्र म्हणून ओळखले जात होते, असाही दावा त्यांनी केला.
मोदी म्हणाले की, देशाला सर्वांत पहिले स्थान हे माझे ध्येय असून, विकसित भारत निर्माण करणे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीदेखील हेच उद्दिष्ट समोर राखावे, असे आवाहन मोदी यांनी केले. ते म्हणाले की, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मी देशासाठी समर्पित केला आहे. २०४७ साली विकसित भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहोरात्र काम करण्याचे वचन जनतेला दिले आहे. पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदी यांची नव्हे तर जनतेची सेवा करणे अपेक्षित आहे. मी सत्ताधीश होण्यासाठी जन्माला आलेलो नाही किंवा सत्ता मिळविणे हे माझे कधी उद्दिष्टही नव्हते, असेही ते म्हणाले.
...म्हणून मला पुन्हा संधी
मोदी यांनी सांगितले की, देशातील १४० कोटी लोकांचा विचार सतत माझ्या मनात असतो. जनता ही मला देवासमान आहे. लोकसभा निवडणुकांतील प्रचाराच्या काळात जनतेचे सामर्थ्य, समर्पण वृत्ती व नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी जनतेत असलेली ऊर्जा या सर्वांचे मला दर्शन झाले. त्यामुळेच जनतेने मला पुन्हा देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील माझे सर्व सहकारी पूर्वीप्रमाणेच पुढील काळातही कार्यरत राहाणार आहेत. राष्ट्र उभारणीसाठी आपले योगदान देणार आहेत.
‘केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनीदेखील राष्ट्रउभारणीच्या कार्यात आपले योगदान दिले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या या योगदानावर शिक्कामोर्तब केले आहे.