"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 11:13 AM2020-09-27T11:13:07+5:302020-09-27T11:38:46+5:30

हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप्पवर ऐकता येऊ शकते. 

Narendra modi Mann Ki Baat radio program on various issues | "संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल"

"संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली; शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल"

Next

नवी दिल्ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपला मासिक कार्यक्रम मनकी बातच्या माध्यमातून आज (रविवारी) जनतेशी संवाद साधतला. या कार्यक्रमात मोदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असतात. हा  रेडिओ कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपवर ऐकता येऊ शकतो. हिंदी प्रसारणानंतर हा कार्यक्रम आकाशवाणीवर वेगवेगळ्या भाषांमध्येदेखील प्रसारित होतो. आजच्या कार्यक्रमात मोदींनी काही प्रसंग सांगितले, तसेच  महात्मा गांधी, भगत सिंग, जयप्रकाश नारायन आणि नानाजी देशमुख यांच्यासह शेती आणि शेतकरी या मुद्द्यांवरही भाष्य केले.

मनकी बात आपडेट्स - 

- कोरोना काळात अधिक काळजी बाळगा, जोवर यावर औषध उपलब्ध होत नाही, तोवर कसल्याही प्रकारचा निष्काळजी करू नका

- यावेळी मोदींनी जय प्रकाश नारायन आणि नानाजी देशमूख यांच्यावरही भाष्य केले. 

- गांधीजींच्या आर्थिक विचारावर चालले गेले असते, तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरजच भासली नसती. महात्मा गांधींच्या आर्थिक चिंतनात भारताच्या नसा-नसाचा विचार होता - मोदी

- मोदी म्हणाले, २ ऑक्टोबर आपल्या सर्वांसाठी प्रेरणादाई दिवस आहे. हा दिवस महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. गांधीजींचे विचार आणि आदर्श आज पूर्वीपेक्षाही अधिक प्रासंगिक आहेत.

- भगत सिंग अखेरपर्यंत एका मिशन साठी जगले. ते मिशन भारताना अन्याय आणि इंग्रजी शासनापासून मुक्ती देणे.

- भगत सिंग क्रांतिकारकाबरोबरच चिंतकही होते. लाला लाजपत राय यांच्या प्रती त्यांचे समर्पण होते.

- शहीद वीर भगत सिंगांना मी नमन करतो.

- शेतीला जेवढे आधुनिक करू ती तेवढी फुलेल.

- आज शेतकऱ्याला आपल्या इच्छेप्रमाणे उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे - मोदी

- मोदी म्हणाले, शेतकरी शक्तीशाली होणे आवश्यक, तो संपन्न झाला तरच आत्मनिर्भर भारताचा पाया तयार होईल. शेतकरी संपन्न झाला, तर भारत आत्मनिर्भर होईल. 

-पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात कृषी क्षेत्राने आपली ताकद दाखवली आहे. देशातील शेतकरी आणि गाव जेवढे मजबूत होईल, तेवढाच देशही आत्मनिर्भर बनेल. 

- पंतप्रधान मोदी म्हणाले, मी अपल्या जीनात प्रचंड फिरलो आहे. रोज नवे गाव, नवे लोक, नवे कुटुंब. भारतात गोष्टी अथवा किस्से सांगण्याची एक जुणी आणि संमृद्ध परंपरा आहे.

- मोदी म्हणाले, प्रत्येक कुटुंबात वृद्ध व्यक्ती, गोष्टी सांगायचे आणि यामुळे घरात नवी उर्जा निर्माण व्हायची.

जेव्हा एखादी आई आपल्या छोट्या मुलाला झोपवण्यासाठी अथवा जेवन देताना गोष्ट सांगते तेव्हा, गोष्टींमध्ये किती सामर्थ आहे, हे कळते.

- आपल्या संबोधनात मोदींनी जनतेला कोरोना काळात सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले कोरोना काळात दोन मिटरचे अंतर राखणे अत्यंत आवश्यक आहे. 

- दोन मिटरचे अंतर कोरोना काळात एक आवश्यकता बनली आहे. मात्र, या संकटाच्या काळानेच कुटुंबातील सदस्यांना जोडण्याचे आणि जवळ आणण्याचेही काम केले आहे. आपल्याला नक्कीच जाणीव झाली असेल, की आपल्या पूर्वजांनी जे नियम तयार केले होते, ते आजही किती महत्वाचे आहेत आणि जेव्हा त्यांचे पालन होत नाही, तेव्हा काय होते.

Web Title: Narendra modi Mann Ki Baat radio program on various issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.