मार्चमध्ये होऊ शकते नरेंद्र मोदी - नवाझ शरीफ भेट
By Admin | Published: February 19, 2016 02:07 PM2016-02-19T14:07:47+5:302016-02-19T14:44:59+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी 31 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान होणा-या आण्विक सुरक्षा परिषदेसाठी पाठवलेलं निमंत्रण नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांनी स्विकारले आहे
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 19 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मार्च महिन्यात भेट होण्याची शक्यता आहे. वॉशिंग्टनमध्ये पुढील महिन्यात होणा-या आण्विक सुरक्षा परिषदेसाठी दोघांनाही अमेरिकेने निमंत्रण पाठवल्याची माहिती मिळाली आहे.
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी 31 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान होणा-या या परिषदेचं पाठवलेलं निमंत्रण नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांनी स्विकारले आहे. आण्विक दहशतीच्या छायेतून जगाची मुक्तता करणे हे या बैठकीचे मुख्य उद्दीष्ट आहे.
ओबामा यांनी 2010मध्ये सुरु केलेल्या या परिषदेत नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ प्रथमच हजेरी लावणार आहेत. डिसेंबर महिन्यात नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांच्यात शेवटची भेट झाली होती, जेव्हा नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदी पाकिस्तानला गेले होते. मात्र पठाणकोट हल्यानंतर दोन्ही देशांतील संबंधावर पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता.