Narendra Modi: आईची पेंटिंग पाहून नरेंद्र मोदींनी थांबवला ताफा; पेटिंग काढणाऱ्या मुलीची केली विचारपूस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:13 PM2022-05-31T17:13:28+5:302022-05-31T17:14:34+5:30
Narendra Modi: केंद्र सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्यांनी राजधानी शिमला येथे रोड शो केला आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटनदेखील केले.
Narendra Modi: भाजप सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी हिमाचल प्रदेशात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या कार्यक्रमात हजेली लावली. यावेळी मोदींचा एक आगळा-वेगळा अंदाज पाहायला मिळाला. शिमल्याहून परतत असताना पंतप्रधानांनी अचानक त्यांची कार थांबवली आणि एका मुलीशी बोलू लागले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रिज मैदानावरील कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मॉल रोडवरुन परतत होते, तेव्हा त्यांना तरुणी त्यांच्या आईचे पेंटिंग घेऊन उभे असल्याचे दिसले. यावर पीएम मोदींनी त्यांची कार थांबवली आणि त्या तरुणीपर्यंत पोहोचले. यावेळी मोदींनी मुलीची विचारपूस केली आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वादही दिला. यावेळी त्या मुलीने मोदींच्या पायाला स्पर्श केला. यानंतर मोदी हे पेटिंग घेऊन निघून गेले.
राष्ट्रनायक की यही पहचान
— BJP Himachal Pradesh (@BJP4Himachal) May 31, 2022
जन-जन को देते सम्मान
प्रधानमंत्री श्री @narendramodi जी ने शिमला आगमन पर अपनी गाड़ी रुकवाकर हिमाचल की बेटी द्वारा बनाई गई पेंटिंग स्वीकार की और बेटी को आशीर्वाद दिया।#8YearaOfGaribKalyanpic.twitter.com/57Und7f8Kd
व्हिडिओ व्हायरल
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पंतप्रधानांच्या हातात त्यांची आई हीराबेन यांची पेंटिंग आहे. हे पेंटिंग त्याच मुलीने बनवले आहे. व्हिडिओ पाहून एका युजरने ट्विटरवर लिहिले की, “आश्चर्यकारक, अविस्मरणीय, सोनेरी क्षण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिमल्यात त्यांची कार थांबवून मुलीने बनवलेल्या पेंटिंगचा स्वीकार केला. हा मोदीजींचा साधेपणा आहे."
मोदींचा शिमल्यात रोडशो
सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे रोड शो केला आणि अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी एका विशाल जनसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी 'किसान सन्मान निधी'चा 11वा हप्ताही जारी केला.