अमर सिंह यांच्याकडे सगळ्यांची कुंडली, उद्योगपतींबरोबरच्या मैत्रीवरून मोदींचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 05:27 PM2018-07-29T17:27:52+5:302018-07-29T22:33:28+5:30
केंद्र सरकार आणि भाजपावर उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघाती हल्ला केला आहे.
लखनौ - केंद्र सरकार आणि भाजपावर उद्योगपतींशी असलेल्या मैत्रीवरून आरोप करणाऱ्या विरोधकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घणाघाती हल्ला केला आहे. ज्या नेत्यांचे उद्योगपतींबरोबर फोटो नाहीत. त्यांनीही उद्योगपतींच्या घरी दंडवत घातले आहेत, अमर सिंहांकडे अशा सर्वांची कुंडली आहे, असे मोदी म्हणाले.
फेब्रुवारी महिन्यामध्ये उत्तर प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या इन्वेस्टर्स समिटदरम्यान राज्यात झालेल्या गुंतवणुकीतून सुरू करण्यात आलेल्या योजनांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौ येते आले होते. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात मोदींनी उद्योगपतींचा सन्मान आवश्यक असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, "असेही काही लोक आहेत. ज्यांची उद्योगपतींसोबत छायाचित्रे नाहीत. पण असा कुणीही उद्योगपती नाही, ज्यांच्या घरी जाऊन त्यांनी दंडवत घातलेला नाही. अमर सिंह यांच्याकडे अशा सर्व नेत्यांची कुंडली आहे."
It is for the second time in the last 5 months that I am meeting my industrial friends in Lucknow. Last time we met for UP Investors Summit in February. I am elated that a huge step is being taken to deliver the promises made there on the ground: PM Modi in Lucknow pic.twitter.com/qp9ahy6kOG
— ANI UP (@ANINewsUP) July 29, 2018
"उद्योगपतींच्या शेजारी उभे राहण्यास घाबरणाऱ्यांपैकी आम्ही नाही. उद्योगपतींसोबत एकही छायाचित्र नसलेल्या काही लोकांना तुम्ही पाहिले असेल. पण देशाती असा एकही उद्योगपती नाही, ज्याच्या घरी जाऊन यांनी साष्टांग दंडवत घातलेले नाही. अमर सिंह या सर्वांची कुंडली बाहेर काढतील." असा इशारा मोदींनी दिला.
#WATCH live from Lucknow: PM Modi speaks at the launch of various projects https://t.co/TEH1RQSlD4
— ANI (@ANI) July 29, 2018