नरेंद्र मोदींनाच आता ‘अच्छे दिन’ची आस!

By admin | Published: May 4, 2015 02:33 AM2015-05-04T02:33:25+5:302015-05-04T02:33:25+5:30

माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केलेला बेधडक शाब्दिक हल्ला, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविलेली जोरदार मोहीम तसेच अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर

Narendra Modi is now a good day! | नरेंद्र मोदींनाच आता ‘अच्छे दिन’ची आस!

नरेंद्र मोदींनाच आता ‘अच्छे दिन’ची आस!

Next

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी केलेला बेधडक शाब्दिक हल्ला, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चालविलेली जोरदार मोहीम तसेच अलीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या मोदी सरकारला स्वत:लाच अर्थव्यवस्था सुधारण्याची पर्यायाने ‘अच्छे दिन’ येण्याची आस लागली आहे.
नैसर्गिक संकटाच्या खाईत सापडलेल्या ग्रामीण भागात सरकारविरुद्ध असंतोषाचा भडका उडाल्याचे पाहता सरकारने भूसंपादन विधेयक थंडबस्त्यात ठेवण्याचा शहाणपणाचा निर्णय
घ्यावा लागणार असे दिसते. सरकारने चौफेर टीकेला उत्तर देण्यासाठी
आधीच व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेतली आहे.
अरुण शौरी यांनी मोदींची
कार्यपद्धती आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अर्थव्यवस्था हाताळण्याच्या पद्धतीवर सडकून टीका केल्यानंतर
सरकारने सारवासारव चालविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले
खास विश्वासू अरुण जेटली यांच्या २ कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थानी जात पत्रकारांशी भोजन बैठकीत संवाद साधला. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Narendra Modi is now a good day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.