लोकसभेत पराभव, तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ; भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या रवनीतसिंग बट्टू यांना दिली संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 11:33 PM2024-06-09T23:33:04+5:302024-06-09T23:43:02+5:30
Narendra Modi Oath Ceremony : पंजाबचे भाजप नेते रवनीत सिंग बिट्टू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली आहे.
Narendra Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत एनडीए'ने बहुमत मिळवले. आज नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये भाजपला एकही जागा मिळवता आली नाही, पण तरीही भाजाने पंजाबच्या रवनीत सिंग बिट्टू यांना मंत्रिमंडळाची शपथ दिली आहे.बिट्टू यांनी रविवारी मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. बिट्टू लुधियानामधून काँग्रेसच्या अमरिंदर सिंग राजा वारिंग यांच्याकडून लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने पराभूत झाले होते. पराभूत होऊनही भाजपाने त्यांना मंत्रिपदावर संधी दिली आहे.
बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत. मुख्यमंत्रीपद भूषवताना बेअंत सिंग यांची दहशतवादी हल्ल्यात हत्या झाली. बिट्टू त्यांच्या प्रोफाइलमुळे मोदी 3.0 चा भाग बनले आहेत कारण भाजप पंजाबमध्ये आपले अस्तित्व मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. मंत्र्यांची निवड करताना भाजपला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील दारूण पराभवही लक्षात ठेवावा लागेल.
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या कॅबिनेट मंत्र्यांमध्ये राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जगत प्रकाश नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, डॉ. एस. जयशंकर, मनोहर लाल, एचडी कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जितन यांचा समावेश आहे. राम मांझी, राजीव रंजन सिंग, सर्बानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार, राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुआल ओराव, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेंद्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन सिंह पुजिजू, डॉ.मनसुख मांडविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील यांचा समावेश आहे.
नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ
लोकसभा निवडणूक २०२४ च्या निकालात भारतीय जनता पक्षाने २४० जागा जिंकल्या आहेत आणि एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. तर तेलुगू देसम पक्षाने १६ तर जनता दल युनायटेडने (जेडीयू) १२ जागा जिंकल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच नरेंद्र मोदीही सलग तीन वेळा सार्वत्रिक निवडणुका जिंकून तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.